शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

यशवंत सिन्हा, फारुक अब्दुल्ला, जावेद अख्तर; शरद पवारांनी बोलावलेल्या जम्बो बैठकीला कोण-कोण राहणार उपस्थित?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (NCP leader Sharad Pawar)

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासह तब्बल 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बैठक मंगळवारी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 6 जनपथ, नवी दिल्ली येथे होईल. तत्पूर्वी, शरद पवार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. (NCP leader Sharad Pawar and opposition meeting in Delhi which leaders will be present at the meeting)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. हे सर्व विरोधक राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली एकत्रित येणार असल्याचेही समजते. तसेच सर्व विरोधकांना एकत्र आणणे हाच शरद पवार यांचा अजेंडा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांचा हा पहिला प्रयत्न नाही, दिल्लीतील बैठकीवर नानांचं स्पष्ट मत

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत 'हे' नेते होणार सहभागी - शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला नेमके कोण-कोण नेते उपस्थित राहणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यांत, फारुख अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, संजय सिंग, पवन वर्मा, डी. राजा, न्यायमूर्ती ए. पी. सिंग, जावेद अख्तर, प्रितीश नंदी, के. टी. एस. तुलसी, करण थापर, वंदना चव्हाण, एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंग, आषुतोश, माजिद मेमन, मनोज झा, सुरेंद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, घनश्याम तिवारी आणि अरुण कुमार, हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बरोबर, पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशीही फोनवरून बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिमतः, या बैठकीत नेमके कोण-कोणते राजकीय पक्ष सहभागी होणार, हे उद्या बैठकीवेळीच स्पष्ट होईल.

शदपवारांचा हा पहिलाच प्रयत्न नाही -शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीबाबत बोलताना, पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या-ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात नवीन काही आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. 

“सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा”: नवाब मलिक

यूपीए की तिसरी आघाडी?शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचे नेतृत्त्व करावे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाYashwant Sinhaयशवंत सिन्हा