शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘नवभारत’ची संपत्ती जप्त होणार

By admin | Updated: September 8, 2014 02:23 IST

नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडद्वारा तारण ठेवण्यात आलेली संपत्ती जप्त करण्याचा आदेश भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) न्यायालयाने दिला आहे

भोपाळ : नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडद्वारा तारण ठेवण्यात आलेली संपत्ती जप्त करण्याचा आदेश भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) न्यायालयाने दिला आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून घेतलेले कर्ज न फेडल्याबद्दल न्या. बी. एस. जामोद यांनी हा आदेश दिला. याबाबतची सूचना नवभारत प्रेसच्या सर्व संचालकांना देण्यात आली आहे.नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी बँक आॅफ महाराष्ट्रकडून घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात भोपाळच्या जहांगीराबाद येथील एक भूखंड तारण ठेवला होता. या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही आणि बँकेतर्फे संचालकांना वारंवार नोटीस जारी करूनही कर्जाची रक्कम जमा करण्यात आली नाही तेव्हा बँकेतर्फे भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार नवभारत प्रेसने बँक आॅफ महाराष्ट्र, जेल रोड, मुर्गी बाजार, जहाँगीराबाद येथील प्लॉट तारण ठेवला होता. नवभारत प्रायव्हेट लि.ने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी रोख ४.७५ कोटी रुपये, मुदती कर्जाच्या स्वरुपात १.२५ कोटी आणि ६.३ कोटी रुपये घेतले होते. सदर संपत्तीचे मूळ दस्तऐवज बँकेजवळ ठेवले होते. हे कर्ज नवभारत प्रायव्हेट लि.ने आतापर्यंत परत केलेले नाही. बँकेद्वारे वेळोवेळी सतत संचालकांना कर्ज परतफेडीबद्दल नोटीस पाठवून व इतर सर्व कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर प्रकरण अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट (एडीएम)च्या न्यायालयात गेले. यावरील सुनावणीनंतर संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाने नवभारत प्रायव्हेट लि. चे संचालक माहेश्वरी पिता-पुत्र यांना आदेश पाठविले होते. (प्रतिनिधी)