शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणी

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणीनाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या ४५ महिन्यांचे वेतन थकल्याने आणि संचालक मंडळाची दोन वर्षांपूर्वीच मुदत संपल्याने कामगार प्रचंड आर्थिक विंवचनेत सापडले असून, एका कामगाराचा उपचाराअभावी, तर दुसर्‍या कामगाराचा कर्जबाजारीपणे आत्महत्त्या केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नाशिक साखर कामगार युनियनने केला आहे.यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकार्‍यांनी नासाकाच्या कामगारांचे ४५ महिन्यांचे पगार मिळणे बाकी आहे. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना एक रुपयादेखील कारखान्याकडून आतापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कामगारांचे जीवन संकटात सापडले आहे. कै. अशोक रामचंद्र फड या कर्मचार्‍यास दवाखान्याच्या उपचारास पैसे नसल्याने मृत्यूस सामोरे जावे लागले आहे, तर १७ मार्च रोजी विठ्ठल शंकर नाठे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. कामगारांची अशी अवस्था असताना ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस कारखाना बंद असल्याने गाळपास कोठे पाठवावा, अशी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नासाका कामगारांचे आर्थिक विवंचनेतून काही बरे वाईट झाल्यास त्यास नासाका संचालक मंडळ व शासन जबाबदार राहणार असल्याचा आरोप नाशिक साखर कारखाना कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यावेळी विष्णुपंत गायखे, विनोद नाठे, शंकरराव रोकडे, सुरेश कुमट, विष्णुपंत गायधनी, चिंतामण विंचू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)