शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:31 IST

Narendra Modi 11 Years as PM: गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. यामध्ये देशाची सुरक्षा ते दहशतवादाविरोधातील कारवाई यासह महागाई, रोजगारासह अनेक विषयांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोदी सरकारची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे ५३.९%, चांगली १३.४%, सरासरी १२.०% आणि वाईट असल्याचे १६.५% लोकांनी म्हटले आहे. तसेच महागाईवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरल्याचे २६% लोकांनी म्हटले आहे. तर काही प्रमाणात यशस्वी असल्याचे २३.९%, कोणताही बदल नाही असे १७.६% आणि काही प्रमाणात अयशस्वी असे ५.२% तर पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे २४.८% लोकांनी म्हटले आहे. 

एवढेच नाही तर बेरोजगारीच्या प्रश्नावरही लोकांनी मोदी कितपत यशस्वी आणि अपयशी ठरलेत ते देखील सांगितले आहे. बेरोजगारी संपविण्यात मोदी सरकार प्रभावी ठरल्याचे २६.३%, काही प्रमाणात प्रभावी ठरल्याचे २७.९%, कोणताही बदल नाही असे १९.९%, काही प्रमाणात अप्रभावी असे ७% तसेच पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे १५% लोकांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी ज्या मुद्द्यावर निवडून आले तो म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा, यात ते कितपत यशस्वी झालेत हे देखील लोकांनी या सर्व्हेत सांगितले आहे. मोदी भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झाल्याचे ३०.८% लोकांना वाटत आहे. काही प्रमाणात तो कमी झाला आहे असे १८.३%, काही प्रमाणात भ्रष्टाचार आहे असे २६.२%, भ्रष्टाचार फारसा कमी झालेला नाही असे १०.१%, अजिबात कमी झालेला नाही असे १३.३% लोकांना वाटत आहे. 

तसेच मोदी सरकारमध्ये सर्वात प्रभावी सुधारणा म्हणजे डिजिटल इंडिया ही आहे. १९.९% लोकांनी याला मत दिले आहे. यानंतर जीएसटी ११.५%, मेक इन इंडिया १०%, सीएए ९.१%, कलम ३७० १८.१%, जन धन-आधार-मोबाइल-९.१% व इतरला १६.६ लोकांनी मत दिले आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे हाताळले असे ४२.७% लोकांनी म्हटले आहे. अंशतः प्रभावीपणे हाताळल्याचे २२.६% लोकांना वाटत आहे तर कोणताही बदल नाही असे १३.७% लोकांना वाटत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानInflationमहागाईjobनोकरी