नारायण साई प्रकरणातील साक्षीदारावर गोळीबार

By Admin | Updated: May 14, 2015 03:53 IST2015-05-14T03:53:11+5:302015-05-14T03:53:11+5:30

आसाराम बापूचा पुत्र नारायण साई याच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणातील आणखी एका प्रमुख साक्षीदारावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Narayan Sai fired at witnesses in the case | नारायण साई प्रकरणातील साक्षीदारावर गोळीबार

नारायण साई प्रकरणातील साक्षीदारावर गोळीबार

पानीपत : आसाराम बापूचा पुत्र नारायण साई याच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणातील आणखी एका प्रमुख साक्षीदारावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील सानौली गावात बुधवारी ही घटना घडली. आसाराम बापू आणि नारायण साई या बापलेकांविरुद्धच्या बलात्कार प्रकरणातील साक्षीदारांवर हल्ला होण्याची ही सहावी घटना आहे. बुधवारी हल्ला झालेल्या साक्षीदाराचे नाव महेंद्र चावला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात चावला जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार चावलाने केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Narayan Sai fired at witnesses in the case