शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परत आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित केले जाईल.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील आठवड्यात दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परत आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित केले जाईल.

गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहेत. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करण्यात येणार, हे ठरणार आहे. भाजपकडून निवडून आलेल्या ४८ आमदारांपैकी १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता या १५ निवडलेल्या आमदारांच्या नावांमधून ९ नावे वगळून मुख्यमंत्री, मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित केले जाईल. 

यासोबतच, विधिमंडळ पक्षाची बैठक १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकते. दरम्यान, दिल्लीतील निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यामुळे दिल्लीतील शपथविधी सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता नरेंद्र मोदींचा परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होईल.

मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेतपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत.  यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा