८१ लाख कॅश, २५ तोळं सोनं... मामाने लाडक्या भाच्याच्या लग्नात दिला १ कोटी ६१ लाखांचा 'मायरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:08 IST2026-02-10T11:06:28+5:302026-02-10T11:08:23+5:30

ललित कुमार व्यास आणि ओमप्रकाश व्यास या दोन भावांनी आपली बहीण गायत्री देवी यांचा मुलगा निलेशच्या लग्नात १ कोटी ६१ लाख रुपयांचा मायरा दिला.

nagore mama paid nephew wedding 81 lakh cash 25 tola gold and other jewelry record breaking | ८१ लाख कॅश, २५ तोळं सोनं... मामाने लाडक्या भाच्याच्या लग्नात दिला १ कोटी ६१ लाखांचा 'मायरा'

फोटो - आजतक

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जायलमध्ये पुन्हा एकदा 'मायरा' परंपरेची जोरदार चर्चा रंगली आहे. ललित कुमार व्यास आणि ओमप्रकाश व्यास या दोन भावांनी आपली बहीण गायत्री देवी यांचा मुलगा निलेशच्या लग्नात १ कोटी ६१ लाख रुपयांचा मायरा दिला. ब्राह्मण समाजात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मायरा मानला जात असून यामुळे जायलच्या परंपरेला एक नवी उंची मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

हा सोहळा जायल येथील माहेश्वरी भवनमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडला. वडील श्यामसुंदर व्यास यांच्या उपस्थितीत दोन्ही भावांनी बहीण गायत्री यांना मायरा दिला. हे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या प्रतीक नसून ब्राह्मण समाजातील एकता, संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे. यामध्ये ८१ लाख रुपये रोख, २५ तोळं सोनं, चांदीचे दागिने, कपडे, भेटवस्तू आणि इतर साहित्य देण्यात आलं.

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जायल-खियाला येथील मायरा ही शतकानुशतके जुनी संस्कृती आहे. यामध्ये मामा आपल्या बहिणीच्या मुलांच्या लग्नात मनापासून भेटवस्तू देतात. या परंपरेवर आधारित 'जायल खियाला रो मायरो' ही गाणी महिला आवर्जून गातात. यापूर्वी प्रामुख्याने जाट समाजात अशा मोठ्या मायऱ्यांची चर्चा व्हायची, मात्र आता इतर समाजही ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहेत.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत नागौरमध्ये अनेक मोठे मायरे भरले गेले आहेत, ज्यात काही कुटुंबांनी कोट्यवधींची जमीन, रोख रक्कम आणि सोने-चांदी भेट दिली आहे. अलीकडेच २१ कोटींहून अधिक रकमेचा मायराही चर्चेत आला होता. मात्र ब्राह्मण समाजाने दिलेले हे योगदान सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. जायल परिसरातील या ऐतिहासिक मायऱ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. राजस्थानमधील प्रथा आजही तितक्याच जिवंत आहेत आणि तिथे नाती पैशाने नव्हे, तर भावना आणि संस्कारांनी मजबूत होतात, हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे.

Web Title : मामा का भव्य उपहार: भांजे की शादी में ₹1.61 करोड़ का 'मायरा'

Web Summary : राजस्थान के जायल में, दो भाइयों ने अपने भांजे को ₹1.61 करोड़ का 'मायरा' दिया, जो एक पारंपरिक विवाह उपहार है। यह कार्य स्थायी सांस्कृतिक प्रथा को उजागर करता है जहाँ मामा महत्वपूर्ण उपहार प्रस्तुत करते हैं, पारिवारिक बंधन को मजबूत करते हैं और सामुदायिक एकता का प्रदर्शन करते हैं। उपहार में नकदी, सोना और अन्य कीमती सामान शामिल थे।

Web Title : Uncle's Lavish Gift: ₹1.61 Crore 'Mayra' at Nephew's Wedding

Web Summary : In Rajasthan's Jayal, two brothers gifted their nephew ₹1.61 crore as 'Mayra', a traditional wedding gift. This act highlights the enduring cultural practice where maternal uncles present substantial gifts, strengthening familial bonds and showcasing community unity. The gift included cash, gold, and other valuables.