शौचालय बांधायला वेळ लावला म्हणून व्यक्तीची हत्या

By Admin | Updated: October 8, 2016 12:06 IST2016-10-08T12:05:20+5:302016-10-08T12:06:27+5:30

महाराजपूर गावामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरु असताना रामानिक साहूच्या कुटुंबाने विपिनला घरातून खेचून बाहेर आणले व बेदम मारहाण केली. लोखंडी सळयांचा सुद्धा वापर केला.

Murder of person as time spent building toilets | शौचालय बांधायला वेळ लावला म्हणून व्यक्तीची हत्या

शौचालय बांधायला वेळ लावला म्हणून व्यक्तीची हत्या

 ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. ८ - घरात शौचायला बांधायला सांगितले या मुद्यावरुन सुरु झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील १४ सदस्यांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यामध्ये घडली. विपिन साहू (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  
 
पाच ऑक्टोंबरला बुधवारी राजनंद जिल्ह्याच्या महाराजपूर गावामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरु असताना रामानिक साहूच्या कुटुंबाने विपिनला घरातून खेचून बाहेर आणले व बेदम मारहाण केली. लोखंडी सळयांचा सुद्धा वापर केला. या जबर मारहाणी विपिनचा मृत्यू झाला. 
 
या सर्व वादाची सुरुवात २० ऑगस्टला ग्रामसभेमध्ये झाली. ग्रामसभेमध्ये जमलेल्या गावक-यांनी विपिन साहूला घरात शौचालय बांधण्यास सांगितले. पण विपिनने पैशाचे कारण पुढे करुन दिवाळीपर्यंतचा वेळ मागितला. त्यावरुन झालेल्या वादातून रामानिक साहू या गावक-याने विपिनला अपशब्द वापरले. 
 
त्यातून विपिनचा अहंकार दुखावला गेला. विपिनला दारु पिण्याची सवय होती. रामनिकचे बोलणे विपिनने मनात ठेवले. विपिन आपल्या कुटुंबाला येता-जाता धमकावत होता म्हणून गावासमोर त्याची हत्या केली असे रामानिकचे म्हणणे आहे. या प्रकरणी एकूण १३ जणांचा अटक केली असून यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. 
 

Web Title: Murder of person as time spent building toilets