शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मुकुल रॉय यांचा बंडाचा झेंडा

By admin | Updated: January 21, 2015 01:35 IST

खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास निकटस्थ शारदा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.राज्यसभेत तृणमूलचे १२ खासदार असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त खासदार ममता बॅनर्र्जींवर नाराज आहेत. शारदा चिटफंड घोटाळ्यातील सहभागाबद्दल सध्या कारागृहात असलेले खा. कुणाल घोष, सुखेंदू रॉय असो की प्रो.जोगेन चौधरी हे सर्व जण ममता ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे त्यावर नाराज आहेत. मुस्लीम खासदारही एकदम खपा आहेत.हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कामकाजाचा खोळंबा केल्यामुळे भाजपचे नेतृत्व चिंतित असले तरी या कथित प्रस्तावावर सावधगिरीचे पाऊल उचलत आहे. रॉय यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अरुण जेटली, रा.स्व. संघाचे नेते सुरेश सोनी, रामलाल आणि अन्य नेत्यांची व्यक्तिश: भेट घेतली.पडद्यामागे हालचालीप. बंगालमध्ये २०१६ मध्ये विधानसभा निवडणुका असून अमित शहा यांनी या राज्यात वारंवार चकरा पाहता पडद्यामागे खूप काही घडत असल्याचे संकेत मिळाले आहेत. बदल्यात हवे संरक्षणरॉय यांनी ममता बॅनर्जी यांचे पितळ उघडे पाडण्याच्या बदल्यात संरक्षणाची मागणी केली आहे. आश्चर्य म्हणजे संपुआच्या कारकीर्दीत रॉय यांना हटवून ज्यांना रेल्वेमंत्री बनविले गेले ते लोकसभेतील खा. दिनेश त्रिवेदी यांनीही रॉय यांच्या बंडाला समर्थन दिले आहे. लोकसभेत तृणमूलचे ३३ खासदार असल्यामुळे फुटीचे राजकारण शिजवणे अवघड जाईल मात्र राज्यसभेतील १२ पैकी ६ खासदारांनी याआधीच ममतांविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे या सभागृहात काम सहज होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत पक्षात उभी फूट पाडण्यासाठी आणखी दोन खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.सीबीआय चौकशीमुळे व्यथितशारदा घोटाळ्यात सीबीआयने समन्स पाठविल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळेरॉय हे दुखावले गेले असून मी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी सर्व काही केले असताना माझा बचाव करण्याऐवजी त्यांनी माझ्यापासून अंतर राखत माझ्यावर खापर फोडले आहे, असे रॉय यांनी भाजपच्या नेतृत्वाला कळविले असल्याचे समजते. च्शहा यांना सर्वप्रथम तृणमूलमध्ये फूट पाडायची असून त्यानंतरच रालोआमध्ये या नेत्यांना प्रवेश देण्यावर ते विचार करतील.