शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुजावरपुरा येथे वन विभागाचा छापा तीन लाखांचा माल जप्त पातुरातील फर्निचरची दुकाने बंद ही कारवाई सुरू करताच शहरातील फर्निचरची तब्बल २५ दुकाने दुकानदारांनी

By admin | Updated: February 19, 2016 00:40 IST

पातूर: शहरातील मुजावरपुरा येथे मोठ्या प्रमाणात चोरीच्या सागवानाची साठवणूक होत असल्याच्या प्राप्त गुप्त माहितीवरून पातूर पोलीस, महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त पथकाने तेथे १८ फेब्रुवारीच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास छापा मारून तीन लाखांचा माल जप्त केला. या ठिकाणाहून आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले.

पातूर: शहरातील मुजावरपुरा येथे मोठ्या प्रमाणात चोरीच्या सागवानाची साठवणूक होत असल्याच्या प्राप्त गुप्त माहितीवरून पातूर पोलीस, महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त पथकाने तेथे १८ फेब्रुवारीच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास छापा मारून तीन लाखांचा माल जप्त केला. या ठिकाणाहून आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले.
पातूर वनपरिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून अनेक सागवान वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे व सागवान लाकूड चोरीस जात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. वनकर्मचारी या सावगान लाकूडचोरांच्या मागावर होते. मुजावरपुरा येथे सागवानाचा माल आणण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपवनसंरक्षक लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस व महसूल विभागाच्या सहकार्याने छापा टाकण्यात आला. सहायक वनसंरक्षक नाईकवाडे यांच्या नेतृत्वात पातूर, मालेगाव, अकोला, बार्शीटाकळी व आलेगाव परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी तसेच अकोल्याचे संरक्षक गोंडाणे व मंगरुळपीर येथील गिरिता देसाई यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईत मुजावरपुरा येथील ८ ते १० घरांमधून चोरीच्या सागवानाच्या लाकडापासून तयार केेलेले फर्निचर, दरवाजासाठी लागणारे कटसाईज लाकूड, लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारा रंधा, आरामशीन आदी साहित्यदेखील जप्त करण्यात आले. या मालाची किंमत तीन लाख रुपये आहे. या कारवाईत शे. खलील शे. दाऊद, शे. तालेब शे. अब्बास, सय्यद युसूफ सय्यद याकूब, सै. मुस्ताक सै. चांद, सै. इम्रान सै. वाहेद, शे. आरिफ शे. नबी यांच्यासह तब्बल १० संशयितांना अज्ञात आरोपी करण्यात आले. हे वृत्त लिहिपर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते वा कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.(वार्ताहर)