शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुफ्तींच्या मुक्ताफळांनी मोदी सरकारची कोंडी

By admin | Updated: March 3, 2015 02:58 IST

जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आपल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्यावरून ठाम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आपल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्यावरून ठाम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले. विरोधकांच्या बरोबरीने मित्रपक्ष शिवसेनाही आक्रमक झाल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. मुफ्ती यांच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असली, तरी ती विरोधकांच्या पचनी पडलेली नाही. लोकसभेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकार व भाजपावर घणाघाती प्रहार करीत पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची आणि निंदाव्यंजक प्रस्ताव पारित करण्याची मागणी केली. त्यानंतर सभात्याग केला. तर राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ करीत मुफ्ती यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने मात्र मुफ्तींच्या त्या वक्तव्याचा सरकार अथवा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुफ्ती मोहंमद सईद यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत हुर्रियत, अतिरेकी संघटना आणि सीमेपलीकडील लोकांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले, असे वादग्रस्त विधान केले होते. शिवाय हेच मत मोदींकडेही मांडल्याचा दावा केला.मतदानाचे श्रेय जनतेचेजम्मू-काश्मिरात शांततापूर्ण वातावरणात विधानसभा निवडणुका पार पडल्याचे श्रेय तेथील जनता, निवडणूक आयोग आणि निमलष्करी दलाला जाते. राज्यातील लोक मोठ्या संख्येने मतदानात सहभागी झाले होते.- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्रीवक्तव्याचा चुकीचा अर्थमाझ्या वक्तव्याचा विनाकारण राईचा पहाड केला जात आहे. मी रविवारी पाकिस्तान आणि हुर्रियतबाबत जे काही बोललो त्यावर कायम आहे. खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गोळ्या किंवा ग्रेनेड नाही, तर लोकशाही पद्धतीने निवडणुकांची गरज असल्याचे त्यांना समजले आहे. म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही. - मुफ्ती मोहंमद सईद