शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

एमपीचे गृहमंत्री सीपी कार्यालयात

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

तासभर चर्चा : अनेक बाबी घेतल्या समजावून

तासभर चर्चा : अनेक बाबी घेतल्या समजावून
नागपूर : मध्य प्रदेश(एमपी)चे गृहमंत्री बाबूलाल गौर आज सकाळी पोलीस आयुक्तालयात पोहचले. त्यांनी तासाभराच्या चर्चेत पोलीस आयुक्त कौशल किशोर पाठक यांच्याकडून आयुक्तालयाच्या कामकाजाची पद्धत समजावून घेतली.
मध्य प्रदेशात पोलीस आयुक्तालयाची प्रथा नाही. त्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. निर्णय घेताना अडचणीचे ठरते. या आणि अशाच अडचणी दूर करून पोलीस अधिकाऱ्यांना कामकाज सहजपणे करता यावे, तातडीने निर्णय घेता यावे, यासाठी मध्य प्रदेशात पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा विचार मध्य प्रदेश सरकार करीत आहे. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री गौर आज सकाळी ११ च्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहचले. त्यांच्यासोबत पोलीस महानिरीक्षक राव होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाची पद्धत गृहमंत्री गौर आणि आयजी राव यांना समजावून सांगितली.
--
अभिनाश कुमार सुटीवर
गंगाजमुना वस्तीतील वेश्याव्यवसाय बंद करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार हे अचानक पाच दिवसांच्या सुटीवर गेल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अभिनाश कुमार हे मूळचे बिहारमधील असून, त्यांना आवश्यक काम आल्यामुळे ते मंगळवारी तातडीने सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र, कुमार यांची चंद्रपूरला बदली होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या अचानक सुटीवर गेल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
--