शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट, नाट्यगृहांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षकांना मुभा; केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 02:33 IST

जलतरण तलाव सर्वांसाठी खुले, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : देशातील चित्रपटगृह, नाट्यगृह चालकांसाठी केंद्र सरकारने बुधवारी एक खूशखबर दिली. याआधीच चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली होती. आता यापेक्षा जास्त प्रेक्षकांना बसण्यास केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संमती दिली आहे.

कोरोना साथीच्या काळासाठी जारी केलेली ही नवी मार्गदर्शक तत्त्वे १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत लागू असतील. केंद्र सरकारने म्हटले आहे की, जलतरण तलाव राष्ट्रीय जलतरणपटूंना वापरण्यास याआधीच परवानगी देण्यात आली होती. पण आता हे जलतरण तलाव सर्वांच्या वापरासाठी खुले करण्यात येणार आहेत.

विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. नागरिकांनी राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावर किंवा मालवाहतुकीवर असलेले निर्बंध याआधीच हटविण्यात आले होते. अशा वाहतुकीसाठी विशेष परवानगीची गरज नाही, असे केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.

सर्व प्रकारच्या प्रदर्शनांना संमतीनव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, आतापर्यंत व्यावसायिक प्रदर्शनांच्या आयोजनासाठीच संबंधित सभागृहांना परवानगी देण्यात आली होती. आता सर्व प्रकारच्या प्रदर्शनांच्या आयोजनास संमती देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंधांपैकी आणखी काही निर्बंध हटविण्याचा निर्णय केंद्रीय नागरी वाहतूक खाते गृहखात्याशी चर्चा करून घेऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार