शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मदर तेरेसा होणार पाचव्या भारतीय कॅथलिक ‘संत’!

By admin | Updated: March 17, 2016 00:51 IST

दीन-दु:खितांची विश्वमाता तथा उपेक्षितांची ‘आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपदाचा बहुमान जाहीर होताच ख्रिस्ती समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

समुद्रमार्गे शिरले होते गुजरातमध्ये

नवी दिल्ली : महाशिवरात्रीच्या निमित्ताने गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर अतिरेकी हल्ला करण्यासाठी आलेल्या १0 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी तीन जणांना सुरक्षा दलांनी र्कठस्नान घातले असून, अन्य सात जणांना जिवंत पकडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी काही अतिरेकी गुजरातमार्गे भारतात शिरले असल्याची माहिती पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीय खान जनुजा यांनी भारताला कळवली होती. त्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयांना सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यातही गुजरातचे सोमनाथ मंदिर तसेच मुंबई आणि दिल्ली हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकेल, हे गृहित धरून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुजरातमध्ये तर पोलीस आणि सुरक्षा दले यांनी महाशिवरात्रीच्या आधीपासूनच दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे त्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.
पाकिस्तानातून १0 दहशतवादी समुद्रमार्गे गुजरातमार्गे शिरल्याच्या माहितीमुळे सुरक्षा दलांनी संबंधित भागांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे १0 पैकी तीन जणांना चकमकीत ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली. अन्य सात जण कोणत्या भागात लपले आहेत, याची माहिती आमच्याकडे असून, त्याआधारे त्यांना जिवंत पकडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र त्याहून अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला.
सुरक्षेच्या कारणांमुळेच तीन दहशतवादी ठार होईपर्यंत ही माहिती जाहीर करण्यात आली नाही. उरलेले सात दहशतवादी गुजरातमध्येच आहेत की देशाच्या अन्य भागात लपलेले आहेत, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा वा जैशै महमद या संघटनांचे असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेनंतर तटरक्षक दलाने तसेच सुरक्षा दलांनी देशातील सर्वच समुद्र किनार्‍यांवर आणि गुजरात तसेच राजस्थानमध्ये आपले लक्ष केंद्रित केले आहे. तेथून आणखी अतिरेकी शिरू नयेत, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे.