शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:55 IST

सात मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्याच २२ वर्षांच्या भाच्यासोबत पळून जाऊन लग्न केले.

उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महराजगंज कोतवाली क्षेत्रातील पुरे अचली गावात, सात मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्याच २२ वर्षांच्या भाच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. या घटनेनंतर पीडित पतीने आपल्या सात मुलांसह पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार पासी असे पतीचे नाव असून तो सध्या दिल्लीत माळीचे काम करतो. राजकुमारने २ ऑगस्ट रोजी आपली पत्नी लालतीला ३ लाख रुपये रोख देऊन गावी पाठवले होते, जेणेकरून गावातील बांधकाम सुरू असलेल्या घराचे छत पूर्ण करता येईल.

पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्याचे उघडएक आठवडा उलटूनही जेव्हा घरात काहीच काम झाले नाही, तेव्हा राजकुमारने गावी आपल्या भावांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याला कळले की, पत्नी लालती गावात पोहोचलेलीच नाही आणि घरासाठी कोणतेही बांधकाम साहित्यही खरेदी करण्यात आलेले नाही.

यानंतर राजकुमारने नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्याला कळले की त्याची पत्नी लालती हैदरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवैचा गावात राहत आहे. लालती दुसऱ्या कोणासोबत नसून, तिच्या २२ वर्षांच्या भाच्यासोबत, उदयराजसोबत त्याच्या घरी राहत होती.

पती राजकुमार काही नातेवाईकांसह देवैचा गावात पोहोचला, तेव्हा पत्नीने त्याला स्पष्ट सांगितले की, तिने उदयराजसोबत कोर्ट मॅरेज केले असून आता तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे. पतीने मुलांचे भविष्य आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करण्यास सांगितले. मात्र, तिने "आता मुलांशी माझा काहीही संबंध नाही," असे धक्कादायक उत्तर दिले.

पोलिसांची पुढील कारवाई सुरूया घटनेमुळे निराश झालेल्या पतीने अखेर आपल्या सात मुलांसह महराजगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. या संदर्भात, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार दाखल करून घेण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेश