प्रेम आंधळं असतं. प्रेमात ना वय पाहिलं जातं, ना चेहरा-रूप. अशी अनेक प्रकरणे अनेकदा समोर येतात, जिथे विवाहित असतानाही पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्याशी लग्न करतात. अशीच एक अविश्वसनीय आणि जोरदार चर्चेत असलेली घटना उत्तर प्रदेशातील अंबेडकरनगरमधून समोर आली आहे.
या भागात राहणाऱ्या एका पाच मुलांच्या आईला तिच्या मोठ्या मुलाच्या वयाच्या एका भंगरवाल्या तरुणासोबत प्रेम झाले. तिने पतीची आणि मुलांची अजिबात पर्वा केली नाही. केवळ प्रेमासाठी तिने थेट पतीसमोरच त्या तरुणासोबत दुसरे लग्न केले. ही प्रेमकथा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
नेमकं काय घडलं?
हे प्रकरण जहांगीरगंजमधील हुसेनपूर खुर्द गावातील आहे. येथे राहणाऱ्या मुन्नी देवी नावाच्या पाच मुलांच्या आईने पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. विशेष म्हणजे, हा प्रियकर तिच्या मोठ्या मुलाच्या वयाचा आहे. पत्नीला दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करताना पाहून तिचा पती देखील दुःखी झाला होता. 'जर तिला माझ्यासोबत राहायचेच नसेल, तर मी काय करू शकतो?' अशी प्रतिक्रिया त्याने अत्यंत दुःखी मनाने दिली. ही गोष्ट संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी या अनोख्या प्रेमकथेवर आश्चर्य व्यक्त केले.
भंगार विकताना जुळले सूत
समोर आलेल्या माहितीनुसार, हुसेनपूर खुर्द गावातील निखिल हा तरुण उदरनिर्वाहासाठी देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस स्टेशन परिसरात फेरी मारून भंगार खरेदी करत असे. भंगार खरेदी करण्याच्या निमित्ताने त्याची भेट मुन्नी देवीसोबत झाली. मुन्नी विवाहित असून, तिला पाच मुले होती. तरीही, त्यांच्यात हळूहळू प्रेम फुलले. निखिलला मुन्नीचे वय आणि ती पाच मुलांची आई आहे, याने कोणताही फरक पडला नाही. दोघांनीही एकत्र आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
पतीच्या उपस्थितीत मंदिरात लग्न
मुन्नीच्या पतीला जेव्हा या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, तेव्हा घरात मोठे भांडण झाले. समाजानेही या नात्यावर टीका केली. मात्र, मुन्नी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी पतीने तिला रोखले नाही. यानंतर मुन्नी आणि निखिल यांनी आलापूर पोलीस स्टेशन परिसरातील एका प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या लग्नात मुन्नीचा पतीही उपस्थित होता.
Web Summary : A mother of five in Uttar Pradesh married a younger scrap dealer in front of her husband. Love blossomed while he collected scrap; societal disapproval didn't deter them from a temple wedding.
Web Summary : उत्तर प्रदेश में पांच बच्चों की मां को एक कबाड़ी वाले से प्यार हो गया और उसने अपने पति के सामने उससे शादी कर ली। कबाड़ इकट्ठा करने के दौरान प्यार परवान चढ़ा; सामाजिक अस्वीकृति उन्हें मंदिर में शादी करने से नहीं रोक सकी।