दुचाकी घसरून आई ठार, मुलगा गंभीर

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नागपूर : दुचाकी घसरल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या इंदूबाई अशोक चौधरी (वय ४५) यांचा करुण अंत झाला.

Mother died of a bike collapse, son serious | दुचाकी घसरून आई ठार, मुलगा गंभीर

दुचाकी घसरून आई ठार, मुलगा गंभीर

गपूर : दुचाकी घसरल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या इंदूबाई अशोक चौधरी (वय ४५) यांचा करुण अंत झाला.
इंदूबाई आणि त्यांचा मुलगा अतुल (वय २५) हे दोघे मायलेक रविवारी दुपारी २.३० वाजता स्प्लेंडरने गोडेगाव येथे जात होते. पारडी उड्डाण पुलाजवळ अतुलची मोटरसायकल घसरली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री डॉक्टरांनी इंदूबाईंना मृत घोषित केले़ कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
----

Web Title: Mother died of a bike collapse, son serious