'मोनिकाची पॉर्न क्लिप बनवून ब्लॅकमेल करायचे होते'

By Admin | Updated: October 11, 2016 10:58 IST2016-10-11T10:55:46+5:302016-10-11T10:58:53+5:30

परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुरडे यांची पॉर्न क्लिप बनवून, त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने कपडे काढायला सांगितले होते, अशी धक्कादायक कबुली मोनिका यांची हत्या करणा-या राजकुमार सिंहने दिली आहे.

'Monica had to make a black clip and make a clip' | 'मोनिकाची पॉर्न क्लिप बनवून ब्लॅकमेल करायचे होते'

'मोनिकाची पॉर्न क्लिप बनवून ब्लॅकमेल करायचे होते'

ऑनलाइन लोकमत

गोवा, दि. 11 - परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुरडे यांची पॉर्न क्लिप बनवून, त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने कपडे काढायला सांगितले होते, अशी धक्कादायक कबुली मोनिका यांची हत्या करणा-या राजकुमार सिंहने दिली आहे. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरू असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याने मोनिकावर लैंगिक अत्याचार करुन तिची व्हिडिओ क्लिप बनवली आहे का?, या दिशेनंही पोलीस चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये, तिच्या गुप्तगांवर जखमा आढळल्या आहेत. मोनिका घुरडे यांच्या हत्येप्रकरणी 21 वर्षांच्या राजकुमार सिंहला गोवा पोलिसांनी रविवारी बंगळुरू येथून अटक केली. ज्याठिकाणी मोनिका राहत होत्या त्याठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राजकुमार वॉचमन म्हणून काम करत होता.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमारीच्या उद्देशाने मोनिकाच्या घरी घुसल्याचे राजकुमारने सांगितले. घरात घुसल्यानंतर, मोनिका यांना चाकूचा धाक दाखवत शांत राहण्यासाठी सांगितले, त्यानंतर तिचे हात पलंगाला बांधून तिच्याकडून एटीएम आणि पिन क्रमांक काढून घेतला. यानंतर तिला कपडे काढायला सांगितले. यावेळी राजकुमारला प्रतिकार करण्यासाठी मोनिकाला आरडाओरडा केला असता त्यानं तिचा गळा दाबला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. 
आणखी बातम्या
 
तिचा गळा दाबल्यानंतर, त्याने किचनमध्ये जाऊन दोन अंडी खाल्ली. यादरम्यान, मोनिका जागी होईल, असे त्याला वाटले, मात्र ती बेशुद्धावस्थेतच होती. गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पळ काढल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या गुप्तगांवर जखमा आढळल्याने राजकुमारने मोनिकावर लैंगिक अत्याचार केले आहेत का?, याची चौकशी पोलीस करत आहेत.   
 

Web Title: 'Monica had to make a black clip and make a clip'