शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल भारत गैरव्यवहारातील म्होरक्या शरण मोहोळ तालुका: मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर झाला हजर

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

मोहोळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्‍या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे तो अखेर एक वर्षानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात हजर होऊन शरण आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

मोहोळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्‍या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे तो अखेर एक वर्षानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात हजर होऊन शरण आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
सन 2013 मध्ये पंचायत समितीकडे निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय लाभार्थींना वैयक्तिक प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 4 हजार 60 रुपयांप्रमाणे 1 कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले होते. यात बोगस लाभार्थी, एकाच व्यक्तिीच्या नावे दोनवेळा ते 23 वेळापर्यंत एकाच परिवाराला हजारो रुपयांचे अनुदान बोगस पद्धतीने वाटप केले. यात 60 ते 70 कोटींचा घोटाळा झाला होता. माहिती अधिकारात दिलेल्या अर्जानुसार घोटाळा निष्पन्न झाला होता. याबाबत सातत्याने उठाव केल्यानंतर प्राथमिक स्वरूपात चौकशी करून 4 जून 2014 रोजी गटविकास अधिकारी संजय आळतेकर यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळेसह 13 जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात 29 लाख 80 हजारांचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्?ामध्ये आजतागायत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु मास्टर माईंड शिक्षक हजरत शेख हा गेल्या वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन दाखल केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर 15 जून रोजी तो मोहोळ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. डी. बी. हंबिरे यांनी 19 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 13 वा आरोपी स्वच्छता प्रेरक समीर भारत गायकवाड (रा. कामती) हा अद्याप फरार आहे.
मध्यस्थीही गजाआड
तपास अधिकारी सपोनि सचिन म्हेत्रे यांनी या घोटाळ्यात एकाच घरात 23 वेळा लाभ घेणारा व अनेकांना लाभ मिळवून घोटाळ्यातील आरोपींना पैसे मिळवून देणारा पोखरापूर येथील नामदेव काळे याला आरोपी करून त्याला अटक केली आहे. त्यालाही न्यायाधीशांनी 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.
व्याप्ती वाढण्याची शक्यता
शौचालय घोटाळ्यातील आणखी तपास बाकी आहे. आणखी आरोपी व गैरव्यवहाराची रक्कम वाढण्यास या मास्टर माईंडची मदत होणार आहे.