शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाप

By admin | Updated: March 1, 2015 03:00 IST

अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत.

पंतप्रधानांच्या नावे सहा नव्या योजना : योग करमुक्त केल्यानंतर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यहरीश गुप्ता - नवी दिल्लीअरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान, योगाचा प्रचार, गंगा शुद्धीकरण किंवा सहा कोटी शौचालये बांधण्याची योजना असो; मोदींच्या या सर्व मिशनला १०० टक्के करसवलत मिळाली आहे. त्यासोबतच कंपन्यांकडून सीएसआरच्या रूपात २ टक्के अतिरिक्त निधीही प्राप्त होणार आहे.जेटली यांनी आपल्या २८ पृष्ठांच्या आणि ९० मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मोदींचा नामोल्लेख टाळला असला आणि योजनांना थेट मोदींचे नाव देण्याचे टाळले असले तरी पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजनांचा शुभारंभ केला आहे. त्यात पंतपधान मुद्रा योजना, पंतप्रधान सुरक्षा (अपघात) विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे.जेटली यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर सुरू केलेल्या ‘अटल नवनिर्माण मिशन’ या योजनेवरही मोदींचीच छाप आहे. तसेच दिवंगत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनाही सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडिया या योजनांच्या माध्यमातून शासनात जनतेला सहभागी करून घेण्याची मोदींची दृष्टी आहे. परंतु जेटलींनी योगाला करमुक्त केल्यानंतर मोदींनीही या घोषणेचे बाके वाजवून स्वागत केले. त्या वेळी जेटलींच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.दिवसातून दोनदा मोदींची भेटच्अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत जेटलींनी मोदींशी सातत्याने चर्चा केली. दिवसातून दोनदा ते मोदींना भेटत होते. विविध मुद्द्यांवर मोदींशी चर्चा करणे आवश्यक होते, असे जेटलींनी स्पष्ट केले.च्अर्थमंत्रालयातील काही अधिकारीही मुद्दे निकाली काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये जेटलींनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्रालयातील अरविंद मायाराम, राजीव टकरु आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटविण्यात आले होते. या सर्वांची नियुक्ती तत्कालीन संपुआ सरकारने केली होती.कवी जेटली म्हणतात...अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कवितेच्या दोन ओळींनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करत शेरेबाजी करण्याची संधी सोडली नाही. कुछ तो फुल खिलाए हमने,और कुछ फुल खिलाने है,मुश्किल यह है, बाग में अबतककांटे कई पुराने है...असे यापूर्वीच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्देशून जेटली यांनी या कवितेचा आधार घेतला.हमे मायूसी का माहोल मिला थायह बदला हुआ आर्थिक माहोल है.