शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोरेगाव- भीमाप्रकरणी मोदींनी मौन सोडावं, दिल्लीत काढणार युवा हुंकार रॅली - जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 1:49 PM

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

ठळक मुद्देकोरेगाव- भीमाप्रकरणी मोदींनी मौन सोडावंदिल्लीत काढणार युवा हुंकार रॅलीमी कोणतंही प्रक्षोभक भाषण केलेलं नाही

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. जिग्नेश मेवाणी यांनी पुण्यातील कोरेगाव भीमाप्रकरणी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मी कोरेगाव भीमा या ठिकाणी कधीही गेलो नाही. ज्यावेळी माझा कार्यक्रम झाला. त्या भाषणात एकही चिथावणीखोर शब्द नव्हता. मात्र याप्रकरणी मला मुद्दाम लक्ष केले जात आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर आणि भाजपावर जिग्नेश मेवाणी यांनी केला.

याचबरोबर, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावं, नाहीतर याचा परिणाम 2019 मध्ये दिसून येईल. येत्या 9 जानेवारीला दिल्लीत युवा  हुंकार रॅली काढणार येणार आहे. यावेळी पंतप्रधान कार्यलयात जाऊन एका हातात मनुस्मृती आणि एका हातात संविधान घेऊन जाणार आणि या दोन्हींपैकी कशावर विश्वास ठेवता, असा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले.

माझ्यासारख्या प्रस्थापित दलित नेत्याला लक्ष्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो दलित बांधवांना काय संदेश देत आहेत, असा सवालही केला. तसेच, कोरेगाव भीमा प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे असे सांगत दलित बांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. याचबरोबर, देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस होण्याची आवश्यकता असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावJignesh Mevaniजिग्नेश मेवानी