शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

फाईल केवळ सरकवणाऱ्यांना मोदी सरकारचा सज्जड इशारा

By admin | Updated: October 1, 2015 00:09 IST

केवळ फाईल सरकवत जबाबदारी झटकू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक जबाबदार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतताच कंबर कसली आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेवळ फाईल सरकवत जबाबदारी झटकू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक जबाबदार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतताच कंबर कसली आहे. मंत्रिमंडळ सहकारी आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्यात ते कोणतीही कसर सोडत नाही, ही बाब सर्वज्ञात आहे. मंत्रिमंडळ सचिवालयाने बुधवारी जारी केलेले परिपत्रक त्याची साक्ष देणारे ठरावे.मंगळवारी रात्री आगमन झाल्यानंतर मोदींनी पुन्हा पकड घट्ट करताना सर्व मंत्रालये आणि विभागांना परिपत्रक पाठवून आंतर मंत्रालयीन सल्लामसलतीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करण्यास बजावले आहे. एकापेक्षा जास्त मंत्रालये आणि विभागांचा समावेश असलेल्या मुद्यांचा निपटारा करण्यास लागणारा विलंब कमी करण्याच्या उद्देशाने हे परिपत्रक जारी करण्यात आले. कोणताही निर्णय न घेता केवळ फाईल सरकवणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. ३० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ( क्रमांक १/५०/३/२०१५- कॅब) संबंधित मंत्रालय किंवा विभागाला कोणत्या दिवशी शेरा मागवण्यात आला आणि सल्लामसलत करण्यात आली ते नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कुणी ठेवला. संबंधित मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आली काय? प्रस्तावात काय मागण्यात आले. त्याचे उत्तर मिळाले काय? त्यासंबंधी तारखेचा मंत्रिमंडळाच्या मसुदा टिपणात उल्लेख करणे आवश्यक राहील.