मोदींनी सामान्यांना कडक चहा नाही तर विष पाजले - केजरीवाल

By Admin | Updated: November 15, 2016 21:16 IST2016-11-15T17:14:10+5:302016-11-15T21:16:40+5:30

काळ्यापैश्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींने सामान्यांना कडक चहा नाही तर विष पाजले आहे असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात केला आहे

Modi did not tease the people harder and poison - Kejriwal | मोदींनी सामान्यांना कडक चहा नाही तर विष पाजले - केजरीवाल

मोदींनी सामान्यांना कडक चहा नाही तर विष पाजले - केजरीवाल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - नोदबंदीमुळे दिल्लीमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काळ्यापैश्यावर नाही तर गरिबांवर वार करण्यात आला आहे. काळ्यापैश्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींने सामान्यांना कडक चहा नाही तर विष पाजले आहे असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात केला आहे. ८ तारखेला मोदींनी पाचशे आणि हजारच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सर्व विरोधक मोदींच्या या निर्णयावरोधात एकत्र आले आहेत.  

विधानसभेतील विशेष सत्रात बोलताना केजरीवाल यांनी मोदीवर निशाना साधाला. काही दिवसांपुर्वी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या नावाखाली मोठा घोटाळा करण्यात आला आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्या सर्व मित्रांना त्यांना फोन करुन आधीच सांगून ठेवलं होतं, असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत.

Web Title: Modi did not tease the people harder and poison - Kejriwal