'मोदींनी लोकसभेत येणे टाळले, याला विरोधी पक्षच जबाबदार'; मंत्री किरेन रिजिजू यांचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 08:16 IST2026-02-08T08:08:12+5:302026-02-08T08:16:18+5:30

पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी ४० ते ५० विरोधी खासदार सभापती ओम बिर्ला यांच्या दालनात घुसले.

'Modi avoided coming to Lok Sabha, opposition party is responsible for this'; Minister Kiren Rijiju makes serious claim | 'मोदींनी लोकसभेत येणे टाळले, याला विरोधी पक्षच जबाबदार'; मंत्री किरेन रिजिजू यांचा गंभीर दावा

'मोदींनी लोकसभेत येणे टाळले, याला विरोधी पक्षच जबाबदार'; मंत्री किरेन रिजिजू यांचा गंभीर दावा

पाटणा - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले नाही याला विरोधी पक्षाचे सदस्यच कारणीभूत असल्याचा दावा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केला.

पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी ४० ते ५० विरोधी खासदार सभापती ओम बिर्ला यांच्या दालनात घुसले. त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. म्हणून पंतप्रधानांना सभागृहापासून दूर ठेवण्याचे ठरवले, असे ते म्हणाले. बिहार विधानसभेच्या स्थापना दिनानिमित्त पाटण्यात आलेले रिजिजू भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल गांधी केवळ माध्यमांत चर्चा व्हावी म्हणून हास्यास्पद विधाने करीत आहेत, असेही ते म्हणाले.

आम्ही घाबरत नाही...

रिजिजू म्हणाले, आम्ही सत्तेत आहोत. कुणालाही घाबरत नाही. मार्शल बोलावून विरोधकांना सहज शांत करू शकलो असतो. परंतु, अशा वर्तनावर आमचा विश्वास नाही. पण ४०-५० खासदारांनी सभापतींच्या दालनात घुसून आक्षेपार्ह भाषा वापरली तेव्हा आम्ही विचार बदलला. म्हणूनच पंतप्रधानांनी राज्यसभेत सविस्तर भाषण केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रचंड प्रगती केली आहे.

Web Title : मोदी के लोकसभा में आने से बचने के लिए विपक्ष जिम्मेदार: रिजिजू

Web Summary : मंत्री रिजिजू ने दावा किया कि विपक्षी सांसदों के अध्यक्ष के कक्ष में अनियंत्रित व्यवहार के कारण प्रधान मंत्री मोदी ने लोकसभा के बजाय राज्यसभा को संबोधित किया। उन्होंने उन पर आपत्तिजनक भाषा का उपयोग करने और कार्यवाही को बाधित करने का आरोप लगाया, जिससे स्थल में बदलाव हुआ। उन्होंने कहा कि सरकार विपक्ष से डरती नहीं है।

Web Title : Opposition responsible for Modi avoiding Lok Sabha: Rijiju

Web Summary : Minister Rijiju claims opposition MPs' unruly behavior in the Speaker's chamber led Prime Minister Modi to address the Rajya Sabha instead of the Lok Sabha. He accused them of using offensive language and disrupting proceedings, forcing the change in venue. The government, he stated, isn't afraid of the opposition.