शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल : राज ठाकरे

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

वडगाव मावळ (जि. पुणे): मंगेश वाळुंज खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व उर्वरित गुन्हेगारांनात्वरित अटक करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी सखोल तपास करावा. वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

वडगाव मावळ (जि. पुणे): मंगेश वाळुंज खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व उर्वरित गुन्हेगारांनात्वरित अटक करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी सखोल तपास करावा. वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
कामशेत येथे दि. ४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना राजकीय वैमनस्यातून मनसे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा गोळी झाडून खून झाला. मंगेश यांचा भाऊ योगेश ऊर्फ सोनू वाळुंज, बहीण मीनाक्षी वाळुंज व रिना बरदाडे यांची घरी जाऊन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. वाळुंज यांचा खून झाल्याने मनसे मावळ तालुका नेतृत्वात पोकळी निर्माण झाली असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यांच्या भेटीमुळे कामशेत शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस उपअधीक्षक ढाकणे म्हणाले, 'वाळुंज कुटुंबीयांवर एकूण आठ गुन्हे दाखल असून, गुन्‘ातील मुख्य आरोपीची खात्री करून त्यांनाच अटक केली आहे. गुन्‘ात नसलेल्यांना अटक केली जाणार नाही.'
वाळुंज यांच्या कुटुंबीयांनी, मुख्य सूत्रधार आरोपी राजाराम शिंदे, माऊली ऊर्फ बाळकृष्ण शिंदे, रोहिदास शिंदे , शंकर शिंदे , राजू शिंदे, अभिमन्यू शिंदे , बाळू शिंदे व ऋषीनाथ शिंदे या आरोपींना त्वरित अटक करावी. पोलिसांनी माऊली ऊर्फ बाळकृष्ण शिंदे याच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्‘ात नसलेल्या व्यक्तींना अटक केली आहे. आमच्यावर एकूण आठ खोटे गुन्हे दाखल करून आरोपी केले असून गुन्‘ात असलेल्या व्यक्तींना शिक्षा द्या. आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. खुनातील आरोपी मोकाट फिरत असून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली.
---