minor girl raped by friend; Incident in Jharkhand for leaving home on a two wheeler | मित्रासह ९ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दुचाकीवर घरी सोडण्याचे निमित्त, झारखंडमधील घटना

मित्रासह ९ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दुचाकीवर घरी सोडण्याचे निमित्त, झारखंडमधील घटना

नवी दिल्ली : झारखंडच्या दुमका जिल्ह्यात १६ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. सर्व आरोपी फरार आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे या मुलीने घरी परतण्यासाठी मित्राची मदत मागितली होती. त्याने तिची दिशाभूल करून जंगलातून लवकर घरी जाऊ, असे तिला सांगितले. मुलीने तिचा मित्र आणि इतर आठ जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

मित्र वगळता इतर आठ जणांना ही मुलगी ओळखत नाही. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, दुमका गावातून मला माझ्या दोन मित्रांनी गुरुवारी दुपारी दुचाकीवरून माझ्या खेड्याजवळ सोडले. नंतर तिने तिच्या आणखी एका मित्राला बोलावून मला माझ्या खेड्यात नेऊन सोड अशी विनंती केली. तो मित्र आणखी एकाला घेऊन तेथे पोहोचला. मित्रासोबत आलेला मला अनोळखी होता.

पोलीस वाहनांची तपासणी करीत असल्यामुळे आपण जंगलातून जाणाऱ्या जवळच्या रस्त्याने जाऊ, असे त्या मित्राने मला सांगितले, असे तिने म्हटले. जंगलात गेल्यावर तेथे सात अनोळखी लोक होते. त्यांनी व आधीच्या दोन जणांनी माझ्यावर अत्याचार केला.

बेवारस कारमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह
कोरापूत (ओदिशा) : बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेला मृतदेह बेवारस सोडून दिलेल्या कारमध्ये आढळला. मुलीची हत्या करून नंतर मृतदेह कारमध्ये ठेवला, असा संशय आहे. कांचना (जिल्हा कोरापूत) खेड्यात बेवारस सोडून दिलेल्या कारमध्ये मुलीचा मृतदेह असल्याचे स्थानिक रहिवाशांना लक्षात आल्यावर त्यांनी मचकुंड पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचना खेड्यात विधवा तिच्या दोन मुलींसह राहते. शनिवारी ती कामाला गेल्यावर दोन्ही मुलींना घरी ठेवते. सायंकाळी महिला घरी परतल्यावर तिला मुली घरात दिसल्या नाहीत. त्या शेजारी टीव्ही बघायला गेल्या असतील, असे तिला वाटले.
दरम्यान, तिची मोठी मुलगी घरी परतली. परंतु धाकटी बेपत्ता झाली. बराच वेळ धाकटी मुलगी घरी परतली नाही. चिंताग्रस्त आई खेड्यातील ज्येष्ठांकडे गेली. खेड्याभोवती शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. दुसºया दिवशी ग्रामस्थांना तिचा मृतदेह बेवारस कारमध्ये आढळला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.

Web Title: minor girl raped by friend; Incident in Jharkhand for leaving home on a two wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.