minister of state home affairs g kishan reddy on delhi violence said conspiracy | जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान, दिल्लीतल्या हिंसाचारावर गृहराज्यमंत्र्यांचं मोठं विधान

जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान, दिल्लीतल्या हिंसाचारावर गृहराज्यमंत्र्यांचं मोठं विधान

ठळक मुद्देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहेकाँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. मी याचा निषेध करतो. शांततापूर्ण पद्धतीनं विरोध करणं आपला अधिकार आहे. हे कोणत्या प्रकारचं विरोध प्रदर्शन आहे.

नवी दिल्लीः दिल्लीतल्या मौजपूरमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC)च्या विरोधात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे. दिल्ली पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. काँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे.

मी याचा निषेध करतो. शांततापूर्ण पद्धतीनं विरोध करणं आपला अधिकार आहे. हे कोणत्या प्रकारचं विरोध प्रदर्शन आहे. मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की, हिंसा आणि अरेरावी सहन केली जाणार नसून कारवाई करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांना दोषींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांच्या संपर्कात असून, परिस्थितीची माहिती घेत आहे. पोलीस कमिश्नर अमूल्य पटनायक कंट्रोल रुममध्ये स्वतः उपस्थित आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार,  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात  आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.

दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू

Donald Trump's India Visit : कौन है वो?... ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या 'ती'ची गोष्ट

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक

Donald Trump India Visit Live : Donald Trump: चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ

Web Title: minister of state home affairs g kishan reddy on delhi violence said conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.