ठळक मुद्देचीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 2,592 जणांचा मृत्यू झाला आहे.दक्षिण कोरियात कोरोनामुळे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती मून जेई-इन यांनी कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 2,592 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (24 फेब्रुवारी) कोरोनामुळे 150 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 150 पैकी 149 नागरिक हे हुबेई प्रांतातील असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 409 नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. दक्षिण कोरियात कोरोनामुळे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रोग नियंत्रण केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेले 129 नवीन रुग्ण दाएगू शहरातील शिंचेओंजी चर्चशी संबंधित आहेत. कोरियात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती मून जेई-इन यांनी कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोनाबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काही दिवस महत्त्वाचे असणार असल्याचं देथील मून यांनी सांगितलं आहे. 

चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्ये 31 डिसेंबर रोजी आढळला. त्यानंतर अशा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचा संसर्ग वाढू नये, म्हणून रुग्णांसाठी चीनने विशेष रुग्णालय बांधले आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. जपानच्या योकोहामा बंदराबाहेर समुद्रात असलेल्या जहाजावरील ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आली आहे अशा 500 जणांना जहाजातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या जहाजाला ‘अलविदा’ केला. 14 दिवसांचा हा काळ प्रवाशांसाठी त्रासदायक होता. बस आणि अनेक टॅक्सीतून हे लोक आपल्या ठिकाणांकडे रवाना झाले.

Covid - 19; Under three observations in Mumbai | कोविड-१९; मुंबईत तिघे निरीक्षणाखाली

वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. मात्र आता चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती झाल्याची चर्चा सुरू आहे. वुहानमधील फिश मार्केट येथील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील सरकारी साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) ने हा व्हायरसची निर्मिती केली असावी. शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ यांच्या दाव्यानुसार या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राण्यांना ठेवण्यात आले होते. यामध्ये 605 वटवाघळांचा समावेश होता. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची निर्मिती झाली असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

Donald Trump's India Visit : कौन है वो?... ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या 'ती'ची गोष्ट

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक

Donald Trump India Visit Live : Donald Trump: चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus outbreak: Death toll in China jumps to over 2,500, fresh cases reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.