शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध काम केले होते, मुख्यमंत्री ऐकत नाहीत", अनिल विज यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:48 IST

मंत्री अनिल विज म्हणाले, आपल्या पक्षाने आणि सरकारने योग्यरित्या काम केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्री आणि जनतेचे ऐकले पाहिजे.

हरयाणाचे वीज आणि वाहतूक मंत्री अनिल विज यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अनिल वीज यांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. मंत्री अनिल विज म्हणाले, निवडणुकीदरम्यान माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध काम केले होते. आता शंभर दिवस झाले आहेत, परिस्थिती बदलली आहे की, नाही. याने काहीही फरक पडणार नाही. आपल्या पक्षाने आणि सरकारने योग्यरित्या काम केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्री आणि जनतेचे ऐकले पाहिजे.

अनिल विज यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी,  मुख्यमंत्री तुमचे काय ऐकत नाहीत? असा सवाल अनिल विज यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जर मी बोलत असेल तर त्यांनी माझे ऐकले पाहिजे. तसेच, कॅबिनेट मंत्री श्याम सिंह यांनी केलेल्या दाव्याबद्दलही अनिल विज यांनी सविस्तर भाष्य केले. अनिल विज म्हणाले, "श्याम सिंह यांची सुनावणी सुरू झाली आहे ही चांगली गोष्ट आहे, पण १० दिवसांपूर्वी श्याम सिंह यांनी स्वतः मला फोन करून सांगितले होते की, यमुना नगरचे अधिकारी माझे ऐकत नाहीत. तुम्ही एकदा बोलून बघा."

मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर अनिल विज म्हणाले, "मी काहीही केलेले नाही. मी सरकारी बंगला घेतलेला नाही. फक्त एकच गाडी आहे. माझ्या मित्रांनी सांगितले की, गाडी हिसकावून घेतली जाईल. आम्ही ती गाडीही देऊ. जर ते मंत्रीपद हिसकावून घेऊ शकत असतील तर ते सुद्धा करू देत, पण आमदारपद हिसकावून घेऊ शकत नाहीत." दरम्यान, गेल्यावर्षी हरयानामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र, त्याऐवजी नायबसिंह सैनी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेले ७१ वर्षीय अनिल विज यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अंबाला कँट मतदारसंघातून अनिज वीज हे ७२७७ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने अंबाला कँट मतदारसंघातून कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय परविंदर सिंग परीला उमेदवारी दिली होती.

टॅग्स :Anil Vijअनिल विजHaryanaहरयाणा