शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी छावणीवर हल्ला

By admin | Updated: March 21, 2015 23:57 IST

दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

जम्मू : दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर देत हल्ल्यात सामील दोन्ही दहशतवाद्यांना यमसदनी धाडून त्यांचा हा डाव उधळला.राज्यात भाजप-पीडीपी सरकारच्या स्थापनेनंतर शांतता नांदेल, अशी आशा असतानाच दहशतवाद्यांनी सतत दोन हल्ले करून आव्हान उभे केले आहे. कठुआ जिल्ह्यात शुक्रवारी आत्मघाती दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ३ पोलीस शहीद तर एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले होते. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सकाळी सुमारे ५.४५ वाजता मेशवाडा भागातील लष्करी छावणीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. हल्लेखोर आणि सुरक्षा दलात काही तास ही चकमक चालली. गोळीबार सुरू असताना तेथून जात असलेला एक नागरिक सायकलवरुन पडला आणि जखमी झाला. दरम्यान, मोहीम फत्ते झाली असून दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत दिली. आज हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कठुआ हल्ल्यातील हल्लेखोरांशी संबंध होता काय, हे आताच सांगणे कठीण असल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. या हल्ल्यात गोळी लागून कुणीही जखमी झालेले नाही. हल्लेखोरांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला नाही. ते बाहेरूनच गोळीबार करीत होते आणि लष्करी क्षेत्राबाहेरच त्यांना घेरण्यात आले. खबरदारी म्हणून जम्म्ू-पठाणकोट महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ४जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचले आहे. ते उंचावण्याचा प्रयत्न या हल्ल्यांच्या माध्यमाने करण्यात आला. परंतु जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावला, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.४ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक नाले आहेत. त्यामुळे अनेकदा या भागात पाळत ठेवणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) देखरेख आहे.