शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संसद सदस्यांना मिळेल नव्या संस्थेकडून भोजन, उत्तर रेल्वे होणार मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 10:14 IST

पार्लमेंट हाऊस इस्टेटमध्ये कँटीन्स, ॲनेक्स, वाचनालय इमारत आदी ठिकाणी उत्तर रेल्वे खाणपानाची व्यवस्था करते.

नवी दिल्ली : संसद सदस्यांचा नाश्ता व भोजनाची ५२ वर्षांपासून व्यवस्था पाहणारी भारतीय रेल्वे पुढील महिन्यापासून या जबाबदारीतून मुक्त होत आहे. संसद सदस्यांना नवी संस्था नाश्ता व भोजन देईल. संसद सदस्यांना सध्या उत्तर रेल्वे नाश्ता व जेवण देत आहे. पार्लमेंट हाऊस इस्टेटमध्ये कँटीन्स, ॲनेक्स, वाचनालय इमारत आदी ठिकाणी उत्तर रेल्वे खाणपानाची व्यवस्था करते. लोकसभा सचिवालयाकडून उत्तर रेल्वेला पाठविण्यात आलेल्या पत्रात संसद परिसर १५ नोव्हेंबरपर्यंत रिक्त करून संगणक, प्रिंटर्स, फनिर्चर आदी सामग्री सुपूर्द करून सर्व कर्मचाऱ्यांना माघारी बोलावून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. या घडामोडींना संसद आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दुजोरा देत म्हटले की, अगदी ताज्या प्रस्तावानुसार अशोका हॉटेल चालवणारे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन खाणपानाची व्यवस्था हाती घेण्याच्या तयारीत आहे. 

संसद सदस्य, सभागृहांचे कर्मचारी, भेट देणाऱ्यांना कमी किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी त्याला फार मोठे अनुदान दिले जाते. संसदेत खाणपानाची व्यवस्था सामान्यत: संसद सदस्यांची समिती पाहते. सध्याच्या लोकसभेसाठी समिती अजून स्थापन झालेली नाही. हा निर्णय सचिवालय प्रशासनाच्या पातळीवर अंतिम झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

नव्या संसद इमारतीचे डिसेंबरमध्ये बांधकाम -- संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम येत्या डिसेंबरमध्ये सुरू होऊन ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. संसदेचे अधिवेशन विद्यमान इमारतीत कोणताही अडथळा येऊ न देता घेता येईल यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे,  असे लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी म्हटले. - इमारत बांधकाम होताना हवा आणि आवाजाचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती पावलेही उचलण्यात आली आहेत. - नव्या इमारतीत सर्व संसद सदस्यांना स्वतंत्र कार्यालय असेल व पेपरलेस कार्यालयांच्या दिशेने जाण्यासाठी ही कार्यालये अत्याधुनिक डिजिटल इंटरफेसेसयुक्त असतील. 

टॅग्स :ParliamentसंसदMember of parliamentखासदारdelhiदिल्लीfoodअन्न