शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत सर्वपक्षीय इच्छुकांचा भरला मेळा बैठक: राजकारण विरहित संबंध जपण्याचा निर्धार

By admin | Updated: October 10, 2016 00:56 IST

पंचवटी : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या त्या प्रभागात इच्छुकअसलेल्या इच्छुकांच्या निवडणूक चर्चा रंगण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी दुपारी तर पेठरोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये पंचवटी विभागातील नव्या रचनेनुसार असलेल्या प्रभाग क्र मांक २, ४ व ५ मधून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांचा जणू मेळावा भरला होता.

पंचवटी : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या त्या प्रभागात इच्छुकअसलेल्या इच्छुकांच्या निवडणूक चर्चा रंगण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी दुपारी तर पेठरोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये पंचवटी विभागातील नव्या रचनेनुसार असलेल्या प्रभाग क्र मांक २, ४ व ५ मधून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांचा जणू मेळावा भरला होता. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर मनोधैर्य वाढल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापला मित्र परिवार जमा करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवर रंगलेल्या हॉटेलमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, बसपा या पक्षांसह विद्यमान नगरसेवक, नगरसेवक पती व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणुकीच्या निमित्ताने जमलेली ही सर्व मंडळी एकमेकांचे क˜र मित्र असून, आगामी महापालिका निवडणुकीत कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करावी, कोणता प्रभाग सोपा जाईल यावर चर्चा रंगली होती. महापालिका निवडणुकीला आणखी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ज्या त्या इच्छुकांनी आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरु वात केली आहे. निवडणुकीत एकमेकांच्या समोर उमेदवारी करायची की नाही, एकाच पक्षाकडून स्पधर्कांची संख्या वाढली तर काय करायचे या चर्चेवर इच्छुकांनी भर दिला. निवडणुकीच्या पूर्वी रंगलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांच्या या चर्चेत चहापान, भोजनावळ आटोपल्यावर निवडणूक लढविणार्‍या सर्वच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय स्पर्धा होत असल्या तरी पक्षविरहित मैत्रीचे संबंध कायम ठेवण्याची खूणगाठ बांधली. (वार्ताहर) आपण आमने-सामने नको...मनपा निवडणुकीत एकाच प्रभागातून निवडणूक लढावयाची झाल्यास किमान एकमेकांसमोर उभे राहू नये, असे काही इच्छुकांनी सुचवले. तसेच अनेकांनी खासगीत आपल्याला मदत करण्यासंदर्भात शब्द सोडवून घेतला.