शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:56 IST

पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवणारी मुस्कान रस्तोगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण वेगळंच आहे.

पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवणारी मुस्कान रस्तोगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण वेगळंच आहे. मुस्कानने आता वकील बनून स्वतःची केस लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिला एलएलबीचं शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यासाठी तिने जेल प्रशासनाकडे अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धतीबद्दल माहितीही मागितली आहे.

जेल प्रशासनाशी झालेल्या संभाषणात मुस्कान म्हणाली की, तिला आता असं वाटतं की कदाचित कोणताही वकील तिला हवा तसा खटला लढवणार नाही. म्हणूनच ती स्वतः न्यायालयात आपला खटला लढवू इच्छिते. जेलचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानने एलएलबीच्या अभ्यासाबाबत माहिती मागितली आहे. या विनंतीवर जेल प्रशासन विचार करत आहे.

मेरठ जेलमध्ये IGNOU (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) द्वारे हायस्कूल आणि इंटरमिजिएटपर्यंत शिक्षणाची तरतूद आहे. परंतु जेलमध्ये एलएलबीसारखं व्यावसायिक शिक्षण घेणं हे एक नवीन आव्हान आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवरून यावर विचार केला जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जर मुस्कानला खरोखरच शिक्षण घ्यायचं असेल, तर तिला प्रथम हायस्कूल आणि नंतर इंटरमिजिएट पूर्ण करावं लागेल, कारण एलएलबीच्या अभ्यासासाठी किमान शैक्षणिक पात्रता इंटरमिजिएट आहे.

फक्त नववीपर्यंत घेतलंय शिक्षण

मुस्कानने आतापर्यंत फक्त नववीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. अशा परिस्थितीत जर तिला वकील व्हायचं असेल तर तिला एक मोठा शैक्षणिक प्रवास करावा लागेल. प्रथम हायस्कूल, नंतर इंटरमिजिएट आणि नंतर पाच वर्षांच्या एलएलबी प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा लागेल. यासाठी, तिला इग्नूसारख्या संस्थांमधून शिक्षण घ्यावं लागेल किंवा न्यायालयाची विशेष परवानगी घ्यावी लागेल.

सरकारी वकील हा एकमेव आधार 

डॉ. वीरेश राज शर्मा म्हणाले की, आतापर्यंत मुस्कानच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तिला तुरुंगात भेटायला आलेला नाही. दुसरीकडे आरोपी साहिलला त्याची आजी आणि भाऊ  भेटले आहेत. साहिलचं कुटुंब त्याच्यासाठी वकीलाची व्यवस्था देखील करत आहे, तर मुस्कान सध्या फक्त सरकारी वकिलावर अवलंबून आहे.

पतीची हत्या करून निळ्या ड्रममध्ये ठेवले तुकडे

मुस्कानने प्रियकर साहिलच्या मदतीने तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण केवळ मेरठमध्येच नाही तर देशभरात चर्चेत होतं. पतीची हत्या केल्यानंतर मुस्कानने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये लपवले. त्यानंतर ती साहिलसोबत शिमलाला गेली. दोघांनीही तिथे मजा केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे धक्कादायक प्रकरण उघड झाल्यावर मुस्कानला अटक करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगEducationशिक्षण