शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा ‘मुलायम’ प्रस्ताव मायावतींनी धुडकावला

By admin | Updated: August 14, 2014 11:42 IST

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टीसोबत निवडणूक युतीचा प्रस्ताव मांडला.

यूपी विधानसभा निवडणूक : हत्ती स्वबळावर
 
नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टीसोबत निवडणूक युतीचा प्रस्ताव मांडला. परंतु बसपा सुप्रीमो मायावती यांनी तो फेटाळून लावताना त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल आणि कोणाचीही मदत घेणार नाही असे स्पष्ट सांगितले.
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पुढाकार घेतल्यास बसपासोबत हातमिळवणीस आपली हरकत नसल्याचे मुलायमसिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने भाजपाविरुद्ध एकजूट झाले पाहिजे असा सल्ला लालूप्रसाद यांनी दिला आहे. त्याअनुषंगाने मुलायमसिंग 
यांना विचारणा करण्यात आली 
होती.
दुसरीकडे बसपा प्रमुख मायावती यांनी सपासोबत युतीची शक्यता फेटाळताना सांगितले की, सपा जेव्हाजेव्हा सत्तेत आली राज्यात गुन्हेगारी, सांप्रदायिक हिंसाचार, बलात्कार, दरोडे आदी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि हेच या पार्टीचे चारित्र्य आहे. बसपा स्वबळावर निवडणुका लढवेल आणि राज्यातील जनता कोणाच्याही सहकार्याशिवाय मला सत्ता काबीज करण्यास मदत करतील याचा पूर्ण विश्वास आहे. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर सपासोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेत आल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करणा:यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि बलात्काराच्या घटनांना पूर्णपणो लगाम घालण्यात येईल, अशीही ग्वाही मायावती यांनी दिली आहे.  
बिहारमध्ये राजकीय प्रतिद्वंद्वी लालूप्रसाद यादव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी जवळपास दोन दशकांनंतर राजकीय युती केली आहे. या युतीनंतर राजद प्रमुखांनी उत्तर प्रदेशातही सपा आणि बसपाने अशाचप्रकारे एकत्र यायला हवे,असा सल्ला दिला होता. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाने 80 पैकी 71 जागांवर तर त्याचा मित्र पक्ष अपना दलने दोन जागांवर विजय संपादित केला आहे. (वृत्तसंस्था)
--------------
1993 साली सपा आणि बसपाने विधानसभेची निवडणूक एकत्रित लढविली होती. परंतु नंतर ते विभक्त झाले होते. त्यावेळी बसपासोबत समझोता ही फार मोठी राजकीय चूक होती,असे यादव यांनी म्हटले होते.