Manohar Parrikar Death: 'Country will never forget your contribution', tribute to manohar Parrikar by president ramnath kovind | Manohar Parrikar Death: 'देश कधीही तुमचं योगदान विसरणार नाही', राष्ट्रपतींकडून पर्रीकरांना श्रद्धांजली 

Manohar Parrikar Death: 'देश कधीही तुमचं योगदान विसरणार नाही', राष्ट्रपतींकडून पर्रीकरांना श्रद्धांजली 

पणजी : गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनाने देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या जात होत्या. मात्र, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी आता भाजपने तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत. प्रमोद सावंत विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यासमोर काही कायदेशीर अडचणी आहेत.

राष्ट्रपतींचे ट्विट


Web Title: Manohar Parrikar Death: 'Country will never forget your contribution', tribute to manohar Parrikar by president ramnath kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.