मंगळसूत्र चोरणार्‍या महिलेस अटक

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:31+5:302015-08-31T21:30:31+5:30

अकलूज :

Mangalsutra stealing woman arrested | मंगळसूत्र चोरणार्‍या महिलेस अटक

मंगळसूत्र चोरणार्‍या महिलेस अटक

लूज :
अकलूज बसस्थानकामध्ये बसमध्ये चढणार्‍या प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चोरणार्‍या महिलेस प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. यावेळी प्रवाशांनी चोरट्या महिलेस चांगलाच चोप दिला. या महिलेची दुसरी साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली.
राजीव गांधीनगर-येरवडा (पुणे) येथील शंकराम्मा बसप्पा सुलगले या आज(सोमवारी) सकाळी 11 वाजता अकलूज बसस्थानकामधून बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ताणले जात असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी मंगळसूत्र खेचणार्‍या महिलेचा हात धरून ठेवला आणि आरडाओरडा केला. मंगळसूत्राला हिसका मारल्यामुळे ते तुटले आणि त्यातील सोन्याच्या मण्या जमिनीवर सांडल्या. मंगळसूत्र चोरू पाहणार्‍या महिलेला रंगेहाथ पकडल्याने संतप्त झालेल्या सहप्रवाशांनी या महिलेला चांगलाच चोप दिला. यावेळी रजा टाकून घरी जात असलेल्या महिला हवालदार पूनम रजपूत योगायोगाने बसस्थानकावर होत्या. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु सर्वांच्या गडबडीमध्ये मंगळसूत्र चोरणार्‍या महिलेची दुसरी महिला साथीदार मात्र पसार झाली. मंगळसूत्र चोरणारी महिला अनुसया युवराज कांबळे ही मलकापूर (उस्मानाबाद) येथील रहिवासी आहे. महिला हवालदार पूनम रजपूत यांनी सदर चोरट्या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. या महिलेवर भादंवि 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Web Title: Mangalsutra stealing woman arrested