शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मंदिर तोडणार, पुन्हा मशीद बांधणार! राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मुस्लिम नेत्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 3:13 PM

राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.

ठळक मुद्देमशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाहीबाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहीलमंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि पुढील निर्देशांनुसार अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. मात्र असे असले तरी या मुद्द्यावरून काही जणांकडून पुन्हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. काल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज अजून एका मुस्लिम नेत्याने या प्रकरणी पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल. 

दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही राम मंदिरावरून काल वादग्रस्त विधान केले होते. बाबरी मशीद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, मशिदीत मूर्ती ठेवल्याने किंवा नंतर पूजा सुरू केल्याने तसेच बराच काळ नमाज पठणास बंदी घातल्याने मशिदीचा दर्जा संपुष्टात येत नाही, बाबरी मशीद ही हिंदूंच्या कुठल्याही प्रार्थनास्थळाला तोडून बांधण्यात आली नव्हती. असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपल्या पत्रकात म्हटले होते. तसेच मंदिर तोडून मशीद बांधण्याबाबत इशारा दिला होता.एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनावर टीका केली होती. भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसी म्हणाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्यावुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPoliticsराजकारण