शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

Sanchar Saathi: 'संचार साथी'वर संशयाचे ढग! ॲपच्या अनिवार्यतेवरून विरोधकांनी उठवले रान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:18 IST

Sanchar Saathi APP: भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा अ‍ॅप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे.

भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा अ‍ॅप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. याबाबत दूरसंचार विभागाने स्मार्टफोन उत्पादकांना कडक सूचना जारी केल्या आहेत. सायबर फसवणूक रोखणे त्यामागचा उद्देश आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा करण्यासाठी तयार केलेले हे अ‍ॅप वापरकर्त्यांना अनइन्स्टॉल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. परंतु, दूरसंचार विभागाच्या निर्देशांना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी विरोध दर्शवला. तसेच हे अ‍ॅप असंवैधानिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्मार्टफोन वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये 'संचार साथी' हे ॲप प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जे फोन आधीच बाजारात विक्रीला आहेत, त्यांच्यामध्येही सॉफ्टवेअर अपडेटद्वारे अ‍ॅप देणे बंधनकारक करण्यात आले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन निर्मात्यांना या आदेशाची पुढील ९० दिवसांत अंमलबजावणी करणे अनिवार्य असेल. हा नियम ॲपल, सॅमसंगपासून ते शाओमी, गुगल, ओप्पो, व्हिवो यांसारख्या सर्व कंपन्यांना लागू आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांची सुरक्षा वाढण्यास मदत मिळेल, तसेच आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड करणे आता अजामीनपात्र गुन्हा ठरल्याने गैरप्रकारांना आळा बसेल, असे सरकारचे मत आहे. भारतात तयार होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या सर्व फोनमध्ये १२० दिवसांच्या आत हे ॲप प्री-इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, वापरकर्त्यांना हे ॲप अनइन्स्टॉल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

केसी वेणुगोपाल काय म्हणाले?

केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, "बिग ब्रदर आपल्यावर लक्ष ठेवू शकत नाही. दूरसंचार विभागाचा हा निर्देश असंवैधानिक आहे. गोपनीयतेचा अधिकार हा संविधानाच्या कलम २१ मध्ये समाविष्ट असलेल्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. हे सरकारी अ‍ॅप नागरिकांच्या क्रियाकलाप, संभाषण आणि निर्णयावर लक्ष ठेवण्याचे एक साधन आहे." त्यांनी असाही आरोप केला की, "भारतीय नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणला जात आहे, जे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही सरकारच्या निर्देशाला विरोध करतो आणि ते त्वरीत मागे घेण्याची विनंती करतो."

English
हिंदी सारांश
Web Title : Sanchar Saathi App: Controversy Erupts Over Mandatory Pre-Installation

Web Summary : India mandates 'Sanchar Saathi' app pre-installation on new smartphones for cybersecurity. Unremovable, it faces opposition; Congress calls it unconstitutional, alleging privacy violation and surveillance.
टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा