शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

मनपावर शासनाची आर्थिक कृपा - मुद्रांकापासूनच्या एलबीटीचे ११ कोटी मिळाले : मलेरिया फायलेरियाचे १४ कोटी मंजूर

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
मुद्रांक शुल्कावर एक टक्का एलबीटी आकरण्यात येतो. ही रक्कम आधी राज्य सरकारकडे जमा होते व नंतर ती महापालिकेला दिली जाते. एलबीटीचे ११ कोटी शासनाकडे थकीत होते. ही रक्कम नुकतीच महापालिकेला मिळाली आहे. मलेरिया फायलेरियाचे देखील ७० कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी ४३ कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती. यापैकी १४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.
आयआरडीपी अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांसाठी पेट्रोलवर वसूल करण्यात आलेल्या सेसमध्ये महापालिकेच्या वाट्याचे ५५ कोटी रुपये आहेत. या बाबतही आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी २५ कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. संबंधित फाईलला मंजुरी मिळतच संबंधित निधी महापालिकेला दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच नागपूर महापालिकेला १०० कोटी रुपयांची मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे.

चौकट....
नव्या आर्थिक वर्षात
मिळणार विशेष अनुदान
नागपूर हे उपराजधानीचे शहर असल्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दरवर्षी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही केवळ घोषणाच ठरली. मात्र,आता नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा विशेष अनुदान देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. नव्या आर्थिक वर्षापासून महापालिकेला हे विशेष अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

चौकट....

दहा दिवसात रस्त्यांचा प्रस्ताव
शहरातील रस्त्यांचे चित्र पालटण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३०० कोटी रुपये देण्यासाठी एक नवा फार्म्युला तयार केला आहे. महापालिकेला रस्त्यांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. सोमवारी या प्रस्तावावर काम सुरू होईल, असे महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले. या संबंधीचा प्रस्ताव तयार करून दहा दिवसात राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविला जाईल. महापालिका व नासुप्रला प्रत्येकी १०० कोटी रुपये द्यायचे आहेत. राज्य सरकार १०० कोटी रुपयांची मदत करेल.