मजुरांची उडाली भांबेरी; पण पोहता येत नसतानाही सर्पमित्रानं विहिरीतील सापाला दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 01:27 PM2020-06-01T13:27:39+5:302020-06-01T13:30:58+5:30

जिवंत सापाला जंगलात सोडून देण्यात आले.अशा रितीने अडकलेल्या सापाची देखील सुटका झाली आणि सा-यांच्या जीव भांड्यात पडला.

Man save Snake 70 Feet Deep In Well Ratlam Mp | मजुरांची उडाली भांबेरी; पण पोहता येत नसतानाही सर्पमित्रानं विहिरीतील सापाला दिलं जीवदान

मजुरांची उडाली भांबेरी; पण पोहता येत नसतानाही सर्पमित्रानं विहिरीतील सापाला दिलं जीवदान

Next

हिरालाल पाटीदार यांच्या विहिरीमध्ये  दुरुस्तीसाठी मजुरांना बोलावण्यात आले होते. विहिर स्वच्छ करण्यासाठी काही मजूर ७० फूट खाली उतरले. या विहिरीत २० ते ३० फूट पाण्याने भरलेली होती. अशात जेव्हा साफ करणा-यां मजुरांना विहिरीत भला मोठा साप त्यांना दिसला. सापाला पाहून भांबेरी उडालेल्या मजुरांनी लगेचच बाहेर येत सर्पमित्राला बोलाविले. 


विशेष म्हणजे, सर्पमित्राला पाण्यात पोहता येत नव्हते. अशात सापाला विहिरीबाहेर काढण्याचे भले मोठे आव्हान सा-यांसमोर होते. अशात एका कामागाराने मोठ्या धैर्याने पुढाकार घेतला. सर्पमित्राच्या मदतीने तो  विहिरीत उतरला. त्या सापाला देखील सुरक्षित बाहेर काढले. जिवंत सापाला जंगलात सोडून देण्यात आले. अशा रितीने अडकलेल्या सापाची देखील सुटका झाली आणि सा-यांच्या जीव भांड्यात पडला.


 हे प्रकरण रतलाम जिल्ह्यातील बदायला माताजी गावात घडले आहे.  तेथे साप वाचविण्यासाठी पोहता येत नसतानाही या सर्पमित्राने दोरीच्या सहाय्याने 70 फूट खोल विहिरीत उतरून साप पकडला. ही माहिती समोर येताच त्या सर्पमित्राचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Web Title: Man save Snake 70 Feet Deep In Well Ratlam Mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.