शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’ अशी जुळून आली....

By admin | Updated: January 27, 2015 23:30 IST

बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताकदिन पथसंचलन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीबराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताकदिन पथसंचलन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही विदेशी नेत्यासोबत आकाशवाणीवर(आॅल इंडिया रेडिओ)संबोधित करणारे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पटकावला आहे. मोदी आणि ओबामा यांनी संयुक्तरीत्या संबोधित केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रसारण मंगळवारी रात्री ८ वाजता झाले. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता त्याचे पुन:प्रसारण होत आहे.ओबामा २५ जानेवारी रोजी हैदराबाद हाऊसमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत सहभागी झाल्यानंतर ‘मन की बात’ या खास कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले. त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मोदी दर आठवड्याला ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेपर्यंत संदेश पोहोचवत असतात, तथापि ओबामांसोबत संयुक्तरीत्या संबोधित करण्याबाबत ते खास उत्साहित होते. मोदींच्याच आग्रहास्तव ओबामांनी व्यग्र कार्यक्रमांमधून ‘मन की बात’ साठी वेळ काढला. संपूर्ण देशाला संबोधित करायचे झाल्यास आकाशवाणीपेक्षा दुसरा चांगला पर्याय कोणता राहणार होता?आॅल इंडिया रेडिओसोबतच डीडी वन, डीडी न्यूज आणि दूरदर्शनवर प्रसारभारतीच्या माध्यमातून तो प्रसारित करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आणि सोशल मीडियावरही स्थान मिळाले. देशभरातील किमान ८५ कोटी लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील होते. भारत आणि अमेरिकेच्या १०० कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला जात आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाबद्दल मोदींनी सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकदा लिहिले आहे.