शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतून भारतीय घुसखोरांच्या हकालपट्टीनंतर ट्रॅव्हल एजंट्सवर मोठी कारवाई, १७ जणांवर गुन्हे, ३ अटकेत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 23:22 IST

Punjab News: डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेत आतापर्यंत चार विमानातून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या  शेकडो भारतीयांना मायदेशात परत धाडण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेत आतापर्यंत चार विमानातून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या  शेकडो भारतीयांना मायदेशात परत धाडण्यात आले आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या या कारवाईनंतर भारतातून लोकांना बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पाठवणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सवरही कारवाईला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये विना परवाना ट्रॅव्हल एजंट म्हणून कामकरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत १७ ट्रॅव्हल एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण पंजाबमध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात छापेमारी करत  आहेत. आज डंकी रूटच्या माध्यमातून लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या एजंटांची ओळख पटवण्यासाठी अमृतसर आणि जालंधरसह अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच जालंधरच्या उपायुक्तांनी परवाना नुतनीकरण न करणाऱ्या २७१ ट्रॅव्हल एजंटना नोटिस बजावली आहे. तसेच ट्रॅव्हल एजंट, इमिग्रेशन कंसल्टन्टच्या कार्यालयांमधील कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांना ट्रॅव्हल एजंटविरोधात कुठलीही तक्रार मिळाल्यास त्वरित उपायुक्तांच्या कार्यालयाला सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, आपापल्या कार्यालयात योग्य नोंदी ठेवण्याचे आणि अपूर्ण कागदपत्रांसह काम न करण्याच्या सूचना ट्रॅव्हल एजंटना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत ट्रॅव्हल एजंटवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका