महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची कु-हाड

By Admin | Updated: July 29, 2014 02:58 IST2014-07-29T02:58:47+5:302014-07-29T02:58:47+5:30

प्रशासनाने हटविलेला ‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ हा फलक आणि कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी भाषकांना केलेल्या अमानुष मारहाणीचे तीव्र पडसाद सोमवारी कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात उमटले

Maharashtra integration committee banned bribe | महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची कु-हाड

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची कु-हाड

बेळगाव : प्रशासनाने हटविलेला ‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ हा फलक आणि कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी भाषकांना केलेल्या अमानुष मारहाणीचे तीव्र पडसाद सोमवारी कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात उमटले. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’वर बंदी घालण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभागृहात सांगितले.
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते के.एस. ईश्वराप्पा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर बंदी घालण्याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra integration committee banned bribe