शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

नबीन यांच्या निर्णयात महाराष्ट्राचा मोठा प्रभाव; राज्यातील तीन भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:12 IST

राम माधव यांचे सक्रिय राजकारणात पुनरागमन

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या पहिल्याच निर्णयात राजकीय पटलावर महाराष्ट्राचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी व इतर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत, तर महाराष्ट्रातील इतर दोन नेत्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन प्रमुख स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे आमदार संजय उपाध्याय यांची बंगळुरू महानगरपालिका निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय उपाध्याय हे भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांची तेलंगणा स्थानिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नबीन यांच्या पहिल्याच निर्णयामुळे भविष्यात काय अपेक्षित आहे, याची झलक मिळते.

राम माधव यांचे सक्रिय राजकारणात पुनरागमन

राम माधव यांना २०२० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात परत पाठविण्यात आले होते. २०२४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केल्यावर सक्रिय राजकारणात त्यांच्या पुनरागमनाचे मोठे संकेत मिळाले. नितीन नबीन यांच्या टीममध्ये राम माधव यांना महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तावडे चंडीगडला रवाना

चंडीगड महापौर पदाच्या खुर्चीवर भाजपचा उमेदवार बसविण्यासाठी भाजप नेते विनोद तावडे आज तडकाफडकी चंडीगडला रवाना झाले. तावडे यांची चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी दिवसाढवळ्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदानपत्रात हेराफेरी केली होती. यानंतर हे प्रकरण खूप गाजले आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. २९ जानेवारीला महापौर, ज्येष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Influence Evident in Nabin's Decisions; Key Roles for BJP Leaders

Web Summary : Nitin Nabin's first decisions as BJP president highlight Maharashtra's political strength. Vinod Tawde gets key election responsibilities, while Sanjay Upadhyay and Ashish Shelar secure significant roles. Ram Madhav's return to active politics is also signaled. Tawde rushes to Chandigarh for mayoral election oversight.
टॅग्स :Nitin Nabinनितीन नबीनVinod Tawdeविनोद तावडे