शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

लेह येथे विजय दर्डा यांना महाकरुणा पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 2:16 PM

एमआयएमसीतर्फे देण्यात येणारा पुरस्कार भिक्खू संघसेना यांच्या हस्ते प्रदान

सुरेशभुसारी लेह : लडाखमधील लेह येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे (एमआयएमसी) यंदाचा महाकरुणा पुरस्कार २०२२ लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना प्रदान करण्यात आला. एमआयएमसीचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना यांनी लेह (लडाख) येथे हा पुरस्कार प्रदान केला.

समाजात प्रेम व सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी करीत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो. यातून समाजात द्वेषाची भावना कमी व्हावी व प्रत्येकामध्ये प्रेम व करुणा या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर आणले होते. विजय दर्डा यांनी या माध्यमातून समाजापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जात सर्व धर्मांतील धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले आहे, अशा शब्दांत भिक्खू संघसेना यांनी विजय दर्डा यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भिक्खू संघसेना यांनी गौरवपत्र, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती विजय दर्डा यांना प्रदान केली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, एमआयएमसीचे उपाध्यक्ष व माजी आमदार सेरिंग संफेल प्रामुख्याने उपस्थित होते. भिक्खू संघसेना यांनी राजेंद्र दर्डा यांचाही सन्मानपत्र, भगवान गौतम बुद्धाची मूर्ती देऊन गौरव केला. यावेळी इटली, व्हिएतनाम व पूर्वोत्तर प्रदेशातून आलेल्या पाहुण्यांचेही स्वागत भिक्खू संघसेना यांच्याहस्ते करण्यात आले. 

पुढील सर्व धर्म परिषद लेहमध्येविजय दर्डा यांनी भिक्खू संघसेना यांनी फुलविलेल्या परिसराची पाहणी केली. शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, दिव्यांगासाठी भिक्खू संघसेना करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. तसेच पुढील वर्षी सर्वधर्म परिषद लेहमध्ये भरवावी, अशी सूचना केली. ही सूचना भिक्खू संघसेना यांनी तत्काळ मान्य केली. कार्यक्रमाचे संचालन निधी मुथाने यांनी केले.

धार्मिक असहिष्णुता रोखणे आवश्यक -विजय दर्डाn    यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय दर्डा म्हणाले, समाज आज एका वेगळ्या संकटातून जात आहे. समाजात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे. या संकटाचा सामना करावयाचा असेल, तर सर्व धर्मांना एक व्यासपीठावर आणून समाजात सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.n    माझ्या परीने मी काम करीत आहे. या कामाची दखल लेह येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरने घेतली. हा पुरस्कार पुढील कामासाठी मला प्रेरणा देईल. तसेच भिक्खू संघसेना यांनी लेहसारख्या भागात एका खडकाळ जागेवर जे नंदनवन फुलवून वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे, या कामाची तोड नाही. त्यांच्या कामाने प्रभावित झालो आहे, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.

मानवतेसाठी काम हाच खरा धर्म- राजेंद्र दर्डाn    यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे व भुकेलेल्यांना अन्न देणे हाच खरा धर्म आहे.n    या मानवतेच्या धर्माचे आचरण भिक्खू संघसेना करीत आहे. मानवतेसाठी काम करीत असलेल्या भिक्खू संघसेना यांच्या कार्याच्या पाठीशी नेहमीच ‘लोकमत’ उभा राहील.n    सर्व धर्म परिषदेचे आयोजन लेह येथे केल्यास मला आनंद होईल, असेही यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले. 

पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारलेn    भिक्खू संघसेना यांच्या शाळांमध्ये लडाख परिसरातील अनेक वंचित विद्यार्थी शिक्षण घेतात; परंतु अनेकांना पैशाअभावी उच्च शिक्षण घेता येत नाही. ही अडचण भिक्खू संघसेना यांनी भाषणात सांगितली होती. n    याची दखल घेऊन विजय दर्डा यांनी यवतमाळ येथीलजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळेल, अशी घोषणा केली.n    या घोषणेचे टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांनी व यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या विदेशी पाहुण्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा