शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महाबली हनुमानालाच सरकारी नोटिशीचा शेंदूर!

By admin | Updated: June 10, 2015 08:44 IST

भिंड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी भीमरूपी महारूद्र मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीलाच नोटीस बजावली असून मंदिर खाली करा, असा आदेश दिला आहे.

भिंड ( मध्य प्रदेश) : सार्वजनिक जागेवर केलेले अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी माणसांना नोटीस देता देता आता मध्य प्रदेशाातील भिंड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी भीमरूपी महारूद्र मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीलाच नोटीस बजावली असून मंदिर खाली करा, असा आदेश दिला आहे. भिंड नगरपालिकेच्या प्रशासनाने ही नोटीस पुजाऱ्याऐवजी हनुमानाच्या नावेच मंदिराच्या दारावर चिकटविण्याचा प्रताप केला आहे. भिंडमधील छोटी बजरिया भागात हे मंदिर आहे. या धार्मिक स्थळाने सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असून एक आठवड्यात ते काढून घ्यावे, असे प्रत्यक्ष हनुमानजींना बजावण्यात आले आहे. ही घोडचूक आहे असे म्हणत प्रशासन पळवाट काढू पाहात असले तरी नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे आता अटळ आहे. हनुमान प्रभूंच्या नावे ही नोटीस बजावणे ही चूक आहे़ इतर अतिक्रमणाच्या नोटीस बजावताना ही चूक झाली, असे भिंड मनपाचे अतिक्रमण विरोधीपथकाचे प्रमुख धीरेश तिवारी यांनी म्हटले आहे. मनपाचे मुख्य अधिकारी आऱ एस़ चारी यांनी या चुकीसाठी तिवारी यांनाच जबाबदार धरले असून, त्यांच्यावर चौकशीची नोटीस बजावली आहे. पण चौकशीची प्रक्रिया मारुतीच्या शेपटासारखी लांबणार काय, हाही कुतूहलाचा विषय बनला आहे. या अजब नोटिशीत हनुमानांनी ८ बाय १० फूट जागा कचरा काढून मोकळी करावी. आपण होऊन ही जागा खाली न केल्यास नगरपालिका हे अतिक्रमण तोडून टाकेल व कचरा स्वच्छ केला जाईल़ येणारा खर्च मंदिराकडून वसूल केला जाईल, असे बजावले आहे़ अतिक्रमणे स्वच्छ करण्यासाठी मनपाने २१८ नोटिशी बजावल्या आहेत. याचिका दाखल झाल्यानंतर मनपाला जाग आली. कारवाईच्या खर्चाची मंदिराकडून वसुलीया धार्मिक स्थळाने सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असून , एक आठवड्यात ते काढून घ्यावे, असे प्रत्यक्ष हनुमानजींना बजावण्यात आले आहे. हनुमानांनी ८ बाय १० फूट जागा कचरा काढून मोकळी करावी. आपण होऊन ही जागा खाली न केल्यास नगरपालिका हे अतिक्रमण तोडून टाकेल व कचरा स्वच्छ केला जाईल़ येणारा खर्च मंदिराकडून वसूल केला जाईल.