LPG Cylinder: करोडो LPG ग्राहकांसाठी मोठा दिलासा; सिलिंडर भरण्यासाठी पसंतीचा डिस्ट्रीब्युटर निवडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:07 PM2021-06-10T19:07:01+5:302021-06-10T19:07:57+5:30

Good news for LPG customers, the can choose distributors: नव्या सुविधेमुळे तुम्हाला जवळच्या किंवा हव्या असलेल्या डीलरकडून गॅस सिलिंडर भरून घेता येणार आहे. तसेच जर एखाद्या डीलरचा त्रास असेल तर त्यापासूनदेखील सुटका होणार आहे. 

LPG Cylinder: LPG customers can choose distributors to refill cylinder; pilot project in pune and four more cities | LPG Cylinder: करोडो LPG ग्राहकांसाठी मोठा दिलासा; सिलिंडर भरण्यासाठी पसंतीचा डिस्ट्रीब्युटर निवडता येणार

LPG Cylinder: करोडो LPG ग्राहकांसाठी मोठा दिलासा; सिलिंडर भरण्यासाठी पसंतीचा डिस्ट्रीब्युटर निवडता येणार

googlenewsNext

LPG cylinder Refill: केंद्र सरकारने करोडो एलपीजी ग्राहकांसाठी (LPG customers) मोठा दिलासा देऊ केला आहे. एलपीजी ग्राहक गॅस सिलिंडर रिफिल (LPG Refill) करण्यासाठी आपल्या मर्जीनुसार डिस्ट्रीब्युटर निवडू शकणार आहेत. ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने सुरुवातीला ही सुविधा चंदीगढ, कोईंबतूर, गुडगाव, पुणे आणि रांचीच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यास देशभरात ही सेवा सुरु केली जाणार आहे. (LPG customers to have a choice deciding which distributors they want their LPG refill from)



अनेकदा घर बदलल्यामुळे किंवा भाड्याचे घर सोडून दुसऱ्या घरी रहाय़ला गेल्याने डिस्ट्रीब्युटर लांब असतो. त्य़ाच्याकडून सिलिंडर जमा करून दुसऱ्या जवळच्या डिलरकडे रजिस्टर करायचे म्हटल्यास अनामत रक्कम तेवढीच दिली जाते. अन्य पैसे पुन्हा दुसऱ्या डीलरकडे भरावे लागतात. यामुळे ग्राहकांचेच नुकसान होते. आता या नव्या सुविधेमुळे तुम्हाला जवळच्या किंवा हव्या असलेल्या डीलरकडून गॅस सिलिंडर भरून घेता येणार आहे. तसेच जर एखाद्या डीलरचा त्रास असेल तर त्यापासूनदेखील सुटका होणार आहे. 



 


भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी जून महिन्यासाठी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Today) जाहीर केले आहेत. देशात १४.२ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १२३ रुपयांची घट झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला  तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करत असतात. 


तेल कंपन्यांनी जून महिन्यात १४.२ किलोग्रॅम विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच याआधीच्याच किमतीनुसार ८०९ रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हा दर दिल्लीतील आहे. दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट होऊन १४७३.५ रुपये झाली आहे. एप्रिल महिन्यात १४.२ किलोग्रॅम घरगुती सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांनी घट केली होती. तर मे महिन्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. 

विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमती 
तेल कंपन्यांनी १४.२ किलोग्रॅम घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यानुसार दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये, कोलकातामध्ये ८३५ रुपये, मुंबईत ८०९ रुपये आणि चेन्नईत ८२५ रुपये इतकी आहे. 

Web Title: LPG Cylinder: LPG customers can choose distributors to refill cylinder; pilot project in pune and four more cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.