बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:26 IST2026-05-18T06:26:39+5:302026-05-18T06:26:49+5:30

मुंबई विद्यापीठाने बीएससी सत्र ६ परीक्षेचा निकाल ८ दिवसांतच जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण ७,६४८ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी ७,३९० एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

Results of thousands of B.Sc students reserved; University steps in after ABC ID not submitted | बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल

बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष बीएससी सत्र ६ अभ्यासक्रमाच्या १५०१ विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी अभावी निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाने वारंवार सूचना देऊनही कॉलेजांनी एबीसी आयडी जमा न केल्याने विद्यापीठाने ही कारवाई केली आहे. 

मुंबई विद्यापीठाने बीएससी सत्र ६ परीक्षेचा निकाल ८ दिवसांतच जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण ७,६४८ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी ७,३९० एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ३,०३४ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, १,५०१ एवढ्या विद्यार्थ्यांचे निकाल एबीसी आयडीअभावी राखीव ठेवण्यात आले आहेत. या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ६५.११ एवढी आहे, असे विद्यापीठाने सांगितले आहे. 

दरम्यान विद्यार्थ्यांची एबीसी आयडी किवा अपार आयडी ही अतिशय महत्त्वाची बाब असून, त्यांनी कमावलेले श्रेयांक याचा तपशील डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिला जात असतो. त्यांना पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने किवा वैधतेच्या अनुषंगाने आवश्यक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. 

यासाठी एबीसी आयडी महत्त्वाचा 
एबीसी आयडी विद्यार्थ्यांना एकत्रित केलेले श्रेयांक देशभरातील कोणत्याही विद्यापीठात हस्तांतरित व उपयोग करण्याची मुभा देते. 
विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक तपशील ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये सुरक्षित ठेवला जात असल्याने त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत वापरता येते. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या युनिक आयडीमुळे दुहेरी नोंदणी, नक्कल किंवा चुकीची नोंद किंवा फसवणूक टाळली जाऊ शकते. 
विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील डिजिलॉकर, नॅशनल ॲकेडमिक डिपॉझिटरी आणि युजीसी/एनटीए यांसारख्या शासकीय प्रणालींशी डेटा जोडण्यासाठी एबीसी आयडी आवश्यक आहे.
 

Web Title : एबीसी आईडी में देरी: मुंबई विश्वविद्यालय ने हजारों बीएससी परिणाम रोके

Web Summary : मुंबई विश्वविद्यालय ने एबीसी आईडी की कमी के कारण 1,501 बीएससी छात्रों के परिणाम रोक दिए। बार-बार चेतावनी के बावजूद, कॉलेज आईडी जमा करने में विफल रहे। यूजीसी दिशानिर्देशों के अनुसार, एबीसी आईडी क्रेडिट ट्रांसफर और शैक्षणिक रिकॉर्ड सुरक्षा के लिए महत्वपूर्ण है। विश्वविद्यालय ने घोषणा की है कि उत्तीर्ण प्रतिशत 65.11% है।

Web Title : ABC ID Delay: Mumbai University Holds Back Thousands of BSc Results

Web Summary : Mumbai University withheld results for 1,501 BSc students due to missing ABC IDs. Despite repeated warnings, colleges failed to submit the IDs. ABC ID is crucial for credit transfer and academic record security, as per UGC guidelines. The university has announced that the pass percentage is 65.11%.