सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:01 IST2026-05-18T06:01:10+5:302026-05-18T06:01:19+5:30

गुण वाढल्यास पैसेही परत; शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

CBSE provides relief to students; Big reduction in revaluation fee | सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात

सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक सुलभ व परवडणारी करण्याच्या उद्देशाने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरपत्रिकेची प्रत, पडताळणी व विशिष्ट प्रश्नांच्या पुनर्तपासणीसाठी आकारले जाणारे शुल्क यंदा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले असून, पुनर्मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढल्यास भरलेली रक्कमही परत केली जाणार आहे.

नवीन शुल्क रचना 
                               आधी     आता
उत्तरपत्रिकेची प्रत     ७००     १००
पडताळणी     ५००     १००
प्रश्न पुनर्तपासणी     प्रति प्रश्न २५ रु.

अधिक विद्यार्थी होऊ शकतील सहभागी : या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळेल व पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या दृष्टीने या निर्णयाकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Web Title : सीबीएसई छात्रों को राहत: पुनर्मूल्यांकन शुल्क में भारी कटौती, रिफंड भी मिलेगा

Web Summary : सीबीएसई ने पुनर्मूल्यांकन शुल्क में भारी कटौती की है, जिससे प्रक्रिया अधिक किफायती हो गई है। उत्तर पुस्तिकाओं की प्रतियां और सत्यापन शुल्क अब काफी कम हैं। पुनर्मूल्यांकन के बाद अंक बढ़ने पर रिफंड जारी किया जाएगा, जिससे कई छात्रों को लाभ होगा और पारदर्शिता को बढ़ावा मिलेगा।

Web Title : CBSE Relaxes Students: Re-evaluation Fees Significantly Reduced, Refunds Offered

Web Summary : CBSE has significantly slashed re-evaluation fees, making the process more affordable. Fees for answer sheet copies and verification are now substantially lower. Refunds will be issued if marks increase post-re-evaluation, benefiting numerous students and promoting transparency.