'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!

By श्रीनिवास भोसले | Updated: May 18, 2026 05:59 IST2026-05-18T05:58:59+5:302026-05-18T05:59:22+5:30

NEET Exam Paper Leak: सीबीआयची राज्यात नांदेड, लातूर, नाशिक अन् पुण्यात धडक कारवाई सुरूच; क्लासेस चालक, विद्यार्थी अन् पालकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम

NEET Exam Paper Leak: Chemistry scores will not be predicted; classes, parents, and students are also on the radar! | 'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!

'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!

- श्रीनिवास भोसले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सीबीआयने पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून विद्यार्थिनीसह तिच्या पालकांची चौकशी केली आहे. नीट-यूजी २०२६ चा निकाल किंवा उत्तरपत्रिका जाहीर होण्यापूर्वीच पेपरफुटी प्रकरणात संशयित असलेल्या विद्यार्थिनीला केमिस्ट्री विषयात १८० पैकी १८० गुण मिळणार असल्याचा छातीठोक दावा करणारा नांदेडच्या वर्कशॉप परिसरातील तो कोचिंग क्लासदेखील संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी शनिवारी नांदेडात धडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आठ अधिकाऱ्यांचे पथक रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, नांदेडच्या वर्कशॉप परिसरातील नव्याने सुरू झालेल्या एका कोचिंग क्लास चालकाचे आणि एका संस्थाचालकाचे ‘साटेलोटे’ आता सीबीआयच्या रडारवर आले असून, नांदेडमध्ये पुन्हा कोणत्याही क्षणी सीबीआयचे पथक धडकू शकते.

संस्थाचालक अन् क्लासचालकांचे असेही ‘साटेलोटे’
नांदेडमधील एका संस्थाचालकाने आणि क्लासचालकाने मिळून ‘नीट’च्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल केली आहे. जवळपास ४० ते ४५ विद्यार्थ्यांचे पेपर ‘सेट’ करण्यासाठी ५ ते १० लाख रुपयांप्रमाणे वसुली केल्याची दाट शक्यता आहे. शनिवारी या विद्यार्थिनीच्या चौकशीनंतर संबंधित क्लासचालकालाही सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, संबंधित संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना, अशी कोणतीही चौकशी झाली नसल्याचा दावा करीत कानावर हात ठेवले आहेत.

पैकीच्या पैकी गुणांची निकालापूर्वीच जाहिरात
३ मे रोजी नीटची परीक्षा पार पडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अद्याप कोणतीही अधिकृत उत्तरपत्रिका किंवा निकाल जाहीर केलेला नाही. असे असतानाही, नांदेडच्या वर्कशॉप परिसरातील एका कोचिंग चालकाने सोशल मीडियावर थेट जाहिरातबाजी केली. 
आपल्या क्लासच्या तीन विद्यार्थिनींना पैकीच्या पैकी गुण मिळणार असल्याचा छातीठोक दावा, या जाहिरातीत करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, दोन विद्यार्थिनींना केमिस्ट्री विषयात १८० पैकी १८० गुण मिळतील, असा दावा या चालकाने केला होता. त्यापैकी एका विद्यार्थिनीची सीबीआयने चौकशी केली. त्यामुळे सीबीआयच्या पथकाची संशयाची सुई या क्लासेसकडे वळली. यामध्ये आणखी काही विद्यार्थी असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, सीबीआयकडून सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
सीबीआयच्या पथकाने रविवारी सकाळीदेखील शहरातील आणखी दोन पालकाची गुप्त ठिकाणी चौकशी केल्याची माहिती आहे. 

आरसीसीच्या कार्यालयात सीबीआयकडून तपासणी
लातूर : प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या लातूर येथील आरसीसी कार्यालयात रविवारी सीबीआय पथकाने तपासणी केली. लातुरात आलेल्या पथकाने प्रा. मोटेगावकर यांची घरी जाऊन चौकशी केली होती. तद्नंतर पुन्हा रविवारी दुपारी चार जणांच्या पथकाने क्लासेसच्या कार्यालयांमध्ये जाऊन तपासणी केली आहे. सायंकाळपर्यंत पथक तिथे होते. प्रा. मोटेगावकर यांनी रविवारी स्वत: पुणे येथे जाऊन सीबीआयसमोर आपले म्हणणे मांडल्याचे समजते.

प्रा. मनीषा मांढरेला १४ दिवसांची कोठडी
नवी दिल्ली : सीबीआयने अटक केलेल्या पुण्यातील वरिष्ठ बॉटनीच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने न्यायालयात असा दावा केला की, या प्रकरणात विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आल्याच्या शक्यतेचाही तपास सुरू आहे. संपूर्ण एनटीए प्रक्रियाच तपासाच्या कक्षेत असल्याचे तपास यंत्रणांनी न्यायालयात स्पष्ट केले.

Web Title : नीट परीक्षा: केमिस्ट्री के अंकों का अनुमान कोचिंग, अभिभावक, छात्र मुसीबत में!

Web Summary : नीट-यूजी पेपर लीक मामले की जाँच कोचिंग संस्थानों पर केंद्रित है जो सही स्कोर की गारंटी दे रहे हैं। सीबीआई ने नांदेड़ में छात्रों, अभिभावकों और क्लास मालिकों से पूछताछ की। कोचिंग सेंटरों और संस्थानों के बीच संभावित मिलीभगत की जाँच चल रही है, कथित तौर पर पेपर 'सेट' करने के लिए करोड़ों का सौदा हुआ है।

Web Title : NEET Exam: Chemistry Score Prediction Troubles Coaching Classes, Parents, Students!

Web Summary : NEET-UG paper leak investigation focuses on coaching classes guaranteeing perfect scores. CBI investigates students, parents, and class owners in Nanded. A probe into potential collusion between coaching centers and institutions is underway, with alleged multi-crore dealings for 'setting' papers.